Gujarat Titans All Out For First Time In 31 IPL Matches By CSK Ipl 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat Titans All Out for First Time : आयपीएल 2023 (IPL 2023) क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभूत केलं. या विजयासह चेन्नई संघाने विक्रमी कामगिरी केली आहे. धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) फक्त विजय मिळवला नाही तर, संपूर्ण संघाला तंबुत पाठवलं. आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स संघ पहिल्यांदा सर्व गडी बाद झाला. चेन्नई सुपरु किंग्स संघानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने पदार्पण केलं. तेव्हापासून गुजरात टायटन्स संघ यापूर्वीच्या 30 सामन्यांमध्ये कधीही सर्व बाद झाला नव्हता.

आयपीएलमध्ये गुजरात पहिल्यांदा ऑल-आऊट

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्स संघाला ऑल-ऑऊट करणारा चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने पांड्याच्या गुजरातला 25 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात आला. विशेष म्हणजे आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण 31 सामने खेळलेला गुजरात संघ पहिल्यांदा सर्व गडी बाद झाला. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्यांदा चेन्नईनं ऑल-आऊट केलं आहे.

धोनीच्या चेन्नई संघाची ऐतिहासिक कामगिरी

हार्दिक पांड्याच्या गुजरातने यापूर्वी दोन सामन्यांमध्ये नऊ विकेट गमावल्या होत्या. आयपीएल 2022 मधील एका सामन्यात आणि यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये एका सामन्यात गुजरातने नऊ विकेट गमावल्या होत्या. पण चेन्नई सुपर किंग्सने ऐतिहासिक कामगिरी करत क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ तंबूत धाडला. या विजयासह चेन्नईने गुजरात विरोधात पहिला विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात याआधी चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने उतरले होते. याआधी गुजरात संघांने चेन्नई विरोधातील सर्व तीन सामने जिंकले. पण चौथ्या सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पहिल्यांदा पराभव केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा चौथा पराभव

गुजरात टायटन्स आयपीएलमधील चेज मास्टर संघ मानला जातो. धावांचा पाठलाग करताना संघाने अनेक सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा हा चौथा पराभव ठरला. आयपीएल 2022 लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा पहिल्यांदा पराभव झाला होता. तर यंदाच्या हंगामाचा धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही पराभूत झाले.

गुजरातचा 15 धावांनी पराभव

चेन्नई सुपर किंग्सनं दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा 15 धावांनी पराभव झाला. या विजयासोबत चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला संघाने दहाव्या वेळी आयपीएलच्या ( IPL) अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल प्लेऑफमधील पहिल्या पराभवानंतर आता गुजरात टायटन्स, 26 मे रोजी शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि एमआय यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी भिडणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts