Maharashtra News Beed News Sister Committed Suicide By Jumping Into The Dam After Calling Her Brother

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed Suicide News : आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed) समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तर ‘मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असा कॉल महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला केला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर जिजाबाई भारत जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पाली येथील धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपविले. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना दिली.

एका महिलेने पालीच्या धरणात उडी घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धरणाकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्व नातेवाइक पालीच्या धरणावर पोहचले होते. स्थानिक आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. तर जिजाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

नातेवाईकांची धरणाकडे धाव…

जिजाबाई जोगदंड या घरात कोणालाही कोणतेही कल्पना न देता घरातून बाहेर पडल्या. काही वेळात त्यांनी पाली धरण गाठले. धरणावर पोहचताच त्यांनी आपल्या मोबाईलवरून भावाला फोन केला. तसेच  मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे त्यांच्या भावाने तत्काळ याची माहिती जिजाबाई यांच्या घरातील सदस्यांना आणि इतर नातेवाईकांना दिली. त्यामुळे जिजाबाई यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील तत्काळ पाली धरण गाठले. मात्र तोपर्यंत जिजाबाई यांनी धरणात उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं. 

news reels reels

इतर महत्वाच्या बातम्या : 

धक्कादायक! Whatsapp स्टेटसला पतीचा फोटो ठेवून नर्सने घेतला गळफास; बीड जिल्ह्यातील घटना

[ad_2]

Related posts