Immersion of idols taller than 10 feet in ganesh ghat in worli has been prohibited because of coastal road project

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत (Mumbai)  प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने गणेश भक्तांना (ganeshotsav 2023) मोठा धक्का दिला आहे. मुंबई किनारा मार्ग प्रकल्पातील पुलाचे (Mumbai Coastal Road Project) काम सुरू असल्याने वरळीतील गणेश घाटात (लोट्स जेट्टी) येथे गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganesha idols) करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे.

विसर्जन करताना भरतीवेळी दहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींमुळे पुलाच्या कामात समस्या निर्माण होऊ शकते असे कारण देत  किनारा रस्ता प्रकल्प आणि मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

वरळीसह लोअर परळ आदी भागांतील गणेश मंडळांमध्ये महापालिकेच्या या निर्णयाने नाराजी पसरली आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना विसर्जनासाठी दुसरा पर्याय द्यावा, नाहीतर दहा फुटांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटातच करु, असा इशारा समितीने दिला आहे.

मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत मुंबई किनारा मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यातल्या दुसऱ्या टप्प्यातील वरळीतील गणेश घाट येथील 180 मीटर लांबीच्या पुलाच्या स्लॅबचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक यंत्रे समुद्रात आहेत. 

विसर्जनानंतर दहा फूट आणि त्यापेक्षा उंच मूर्ती भरतीमुळे या यंत्रापर्यंत जाऊ शकतात. तसेच पुलाच्या कामाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts