[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : अवघ्या काही तासांत भारत (India Moon Mission) नवा इतिहास रचणार आहे. अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकेल. सगळ्यांनाच या मोहिमोची मोठी उत्सुकता लागलेली आहे. चंद्र नेमका कसा दिसतो? याचे अनेक फोटो आपण आतापर्यंत पाहिले आहे. नासा आणि इस्रो सारख्या संस्थांनीदेखील आपल्याचा आतापर्यंत वेगवेगळ्या फोटोच्या माध्यमातून चंद्र नेमका कसा आहे, हे दाखवलं आहे. मात्र पृथ्वीवरुन आतापर्यंतचा सगळ्या स्पष्ट फोटो पुण्यातील 18 वर्षांच्या प्रथमेश जाजू या तरुणाने दोन वर्षांपूर्वी टिपला होता. दोन वर्षांपूर्वी चंद्राच्या या फोटोला अनेकांनी ट्वीट केलं होतं, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता. प्रथमेशच्या फोटोग्राफीचं अनेक स्तरावरुन कौतुकही करण्यात आलं होतं. मात्र 16 व्या वर्षी पुण्याचा प्रथमेश थेट अॅस्ट्रोफोटोग्राफर ( astrophotographers) कसा बनला? त्याने हा फोटो नेमका कसा टिपला याची गोष्ट.
“रात्री दीडच्या सुमारास घराच्या गच्चीवर मी ज्युपीटर आणि बाकी आकाशगंगा टिपण्यासाठी सेटअप केला होता. कॅमेरा आणि टेलेस्कोपदेखील सेट केला आणि या सगळ्या आकाशगंगा टिपण्याची वाट बघत होतो. त्याचदरम्यान आपण चंद्राचे काही फोटो काढू म्हणून विचार केला आणि संपूर्ण रात्र मी चंद्र टिपत होतो. चंद्राचा हा फोटो टिपून तो सेट करण्यासाठी तब्बल 50 तास लागले. कदाचित आतापर्यंतचा चंद्राचा हा सगळ्यात स्पष्ट फोटो असावा”, असं पुण्याचा 18 वर्षांचा अॅस्ट्रोफोटोग्राफर प्रथमेश जाजू सांगतो.
55 ते 60 हजार फ्रेम्स टिपल्यात…
चंद्राचा फोटो टिपण्याचं ठरवल्यावर प्रथमेशने चंद्राच्या वेगवेगळ्या भागाचे लहान मोठो फोटो एक दोन नाही तर तब्बल 55 ते 60 हजार फ्रेम टिपल्या. या सगळ्या फ्रेम टिपण्यासाठी त्याला किमान चार ते पाच तास लागले. हे फोटो टिपल्यानंतर सगळ्या फ्रेम एकत्र करुन चंद्राचा फोटो तयार करणं त्याच्यापुढे मोठं आव्हान होतं. तब्बल 55 ते 60 हजार फोटो एक करुन, त्याला व्यवस्थित रचना देऊन चंद्राचा आतापर्यंतचा सगळ्यात स्पष्ट फोटो त्याने तयार केला. त्यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याच फोटोमुळे एकारात्रीत त्याची अॅस्ट्रोफोटोग्राफर म्हणून ओळख निर्माण झाली.
अॅस्ट्रोफोटोग्राफीकडे कसा वळला?
वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्याला खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली होती. आकाशातील प्रत्येक ताऱ्याकडे पाहून तो वेगवेगळा विचार करायचा. त्याची हीच आवड ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला एकदा ज्योतीर्विद्या परिसंस्था या संस्थेची ओळख करुन दिली. या संस्थेत खगोलशास्त्राचा अभ्यास केला जातो. याच संस्थेत प्रथमेशने पहिलं पाऊल ठेवलं. त्याला खगोलशास्त्रात आणि अॅस्ट्रोफोटोग्राफीत आवड निर्माण झाली. याच संस्थेत त्याची खगोलशास्त्राशी आणि अॅस्ट्रोफोटोग्राफीशी संबंधित उपकरणांशी ओळख झाली. त्यानंतर त्याने टेलिस्कोपपासून तर अॅस्ट्रोफोटोग्राफी लागणाऱ्या सर्व गोष्टी आवडीने शिकून घेतल्या. सोबतच अॅस्ट्रोफोटोग्राफीसंदर्भात ऑनलाईन माहिती गोळा केली आणि चंद्राचा फोटो टिपला. याच फोटोमुळे प्रथमेशच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.
खगोलशास्त्रज्ञ आणि अॅस्ट्रोफोटोग्राफर व्हायचंय…
प्रथमेश आता बारावी पास झाला आहे. त्याला अमेरिकेत जाऊन खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. अमेरिकेतील चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तो सध्या अभ्यास करत आहे आणि त्याला खगोलशास्त्रज्ञ आणि अॅस्ट्रोफोटोग्राफर व्हायचं आहे.
ज्योतीतिर्विद्या परिसंस्था नेमकी काय आहे?
ज्योतीतिर्विद्या परिसंस्था या संस्थेला बहुतेक भारतीय JVP नावाने ओखळतात. 22 ऑगस्ट 1944 रोजी पुण्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी JVP ची स्थापना केली. प्रामुख्याने खगोलशास्त्राचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शक्य तितके स्वतःचे योगदान देण्यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेत अनेक तरुणांना खगोल शास्त्राची माहिती दिली जाते. शिवाय ज्यांना खगोल शास्त्रात करियर करायचं आहे त्यांना मार्गदर्शनही केलं जातं. JVP च्या लायब्ररीमध्ये काही खूप जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं आहेत. तसेच खगोलशास्त्रावरील नवीन आणि माहिती देणारी पुस्तके आणि मासिकं वाचायला मिळतात. JVP ने अनेक उपकरणांसह निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
पुण्यातील अनेक तरुण सध्या अॅस्ट्रोफोटोग्राफीकडे…
देशात अनेक खगोल शास्त्रज्ञ आहेत. मात्र देशात फार मोठे अॅस्ट्रोफोटोग्राफर नाहीत. भारतात अॅस्ट्रोफोटोग्राफी फार कमी ठिकाणी शिकवली जाते. बाहेर देशात अनेक मोठे अॅस्ट्रोफोटोग्राफर्स आहेत. त्यामुळे मी त्या सगळ्या अॅस्ट्रोफोटोग्राफर्सचा आदर्श घेत फोटोग्राफी करतो, असं प्रथमेश सांगतो. प्रथमेशने टिपलेला फोटो पाहून पुण्यातील अनेक तरुण सध्या अॅस्ट्रोफोटोग्राफीकडे वळले आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांमध्ये अॅस्ट्रोफोटोग्राफी…
पुण्यातील परिसरात प्रदुषण भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातून अॅस्ट्रोफोटोग्राफी करणं किंवा कोणत्याही ताऱ्याला किंवा आकाशगंगेला टिपणं कठिण असतं. त्यामुळे प्रथमेश सुरुवातीला वेताळ टेकडीसारख्या मोकळ्या परिसरात जाऊन फोटोग्राफी करायचा मात्र आता तो तिकोना आणि सह्याद्रीच्या पर्वतरांमध्ये जाऊन तो फोटोग्राफी करतो.
महत्वाच्या इतर बातम्या :
Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न, यश फक्त 8 वेळा; जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?
[ad_2]