Icc Cricket World Cup Online Tickets Bcci Confirms Date And How To Book Here Know In Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How To Book World Cup Online Ticket : भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वजण विश्वचषकातील रंगतदार सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विश्वचषकातील सामन्याच्या तिकिटांकडे सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत आता मोठी अपडेट मिळाली आहे. बूक माय शो या प्लॅटफॉर्मवरुन तिकट बूक करता येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. २५ ऑगस्टपासून तिकिटांची विक्री सुरु होणार आहे. तीन ते चार टप्प्यात विश्वचषकाची तिकिटे मिळणार आहेत. 25 तारखेपासून भारातचे सामने वगळता इतर सामन्यांची तिकिटे मिळणार आहेत. मास्टरकार्ड वापरणाऱ्यांना एक दिवस आधीच म्हणजेच २४ तारखेपासून तिकीट बूक करता येणार आहे. मास्टरकार्ड वगळता  इतरांसाठी २५ तारखेंपासून तिकिटे मिळणार आहेत. दरम्यान, विश्वचषकाशिवाय वॉर्मअप सामन्याची तिकीट विक्रीही सुरु होणार आहे. 

भारताच्या सामन्याची तिकिटे कधीपासून ?

विश्वचषकातील भारताच्या सामन्याची तिकिटे 29 ऑस्टपासून सुरु होणार आहेत. 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून चाहते भारतीय सामन्यांची तिकिटे खरेदी करतील. तर फायनल आणि सेमी फायनल सामन्याची तिकिटे १४ सप्टेंबरपासून उपलब्ध असतील. चाहते विश्वचषकासाठी ऑनलाईन तिकिटे बूक करु शकतात. यंदाचा विश्वचषक पाच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरुवातीचा सामना होणार आहे.  

यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक सुरु होणार असून एकूण 58 सामने होणार आहेत. त्यापूर्वी दहा वॉर्मअप सामने होणार आहेत. विश्वचषक आणि वॉर्मअप सामने भारतातील वेगवेगळ्या १२ मैदानावर होणार आहेत.  

यंदा भारत विश्वचषक जिंकणार का ?

२०११ मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला अनुक्रमे उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले. यावेळी टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकासाठी मैदानात उतरणार आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नईमध्ये होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. 



[ad_2]

Related posts