IPhone 15 Pro Max May Face Three Four Week Shipping Delay Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Iphone 15 Pro Max : आजकाल Iphone ची क्रेझ तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. सर्व लोक आता iPhone 15 series लाँच होण्याची वाट पाहत आहेत. येत्या 13 सप्टेंबरला iPhone 15 ची आगामी सीरिज लाँच होणार आहे. मात्र Iphone यूजर्सकरता एक वाईट बातमी देखील आहे. ती म्हणजे iPhone 15 Pro Max ची डिलिव्हरी ऑक्टोबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रख्यात Sony मोबाईल कंपनी ही Apple iPhone 15 प्रो मॅक्सला येणारा Image Sensor न दिल्याने iPhone 15 Pro Max च्या डिलेव्हरीकरता उशिर होणार आहे.

प्री – ऑर्डर सप्टेंबरपासून सुरू होणार (Pre-Order Starts From September)

एका रिपोर्टनुसार, iPhone 15 सीरीजची प्री-ऑर्डर (Pre-Order) 15 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि सात दिवसांनी डिलिव्हरी (Delivery) ग्राहकांकरता सुरू होईल. या सगळ्यात iPhone 15 Pro Max ची डिलेव्हरी ग्राहकांना उशिरा मिळणार आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांना iPhone 15 Pro Max खरेदी करायचा आहे त्यांना आता वाट पाहावी लागणार आहे. 

 iPhone 15 Pro Max फिचर (Feature)

पेरिस्कोप लेन्स, टायटॅनियम फ्रेम, हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड-स्टेट बटणे, यूएसबी टाइप-सी (Type-C) चार्जिंग पोर्ट, अगदी नवीन बायोनिक चिपसेट आणि अधिक रॅम या नवीन लाइनअपमध्ये दिली जाऊ शकतात. यापूर्वी फोनच्या बॅटरीबाबतही माहिती समोर आली होती.  iPhone 15 लाइनअपमध्ये 40W वायर्ड चार्जिंग आणि 20W वायरलेस (MagSafe) चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. iPhone 15 सीरीजमध्ये F/1.7 अपर्चर दिले जाऊ शकते. पूर्वीच्या मॉडेल्समध्ये ते f/1.79 होते. त्याचा डिस्प्ले अधिक चांगल्या रंगांसह आणि कमी प्रकाशाच्या चांगल्या परफॉर्मन्ससह कॅमेरासह येईल.

आयफोन 15 प्रो मॉडेल A17 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज असेल जो स्मार्टफोन्सच्या दुनियेतील आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसर (Processor) असू शकतो. लाइन-अपमधील इतर मॉडेल्स आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिले जाऊ शकतात. हँडसेटची (Handset) किंमत जवळपास 1.3 लाख रुपये इतकी असू शकते. या डिव्हाइसमध्ये 1.55mm चे बेझल्स असतील जे सध्याच्या आयफोन 14 प्रो पेक्षा जवळजवळ 28 टक्के कमी आहे. आयफोन 14 प्रो मध्ये 2.17mm जाड बेझल्स आहेत. सध्या पातळ बेझल्स असणारा हँडसेट म्हटलं तर Xiaomi 13 असून त्याच्या 1.81mm चा रेकॉर्ड आयफोन 15 प्रो मोडू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या

Meta New Feature : मेटाचं प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल, युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सेवा लवकरच होणार सुरू

[ad_2]

Related posts