Sanjay Raut Said Sharad Pawar Never Support Bjp Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sanjay Raut : राष्ट्रवादीमध्ये फूट, शरद पवार कधीच भाजपसोबत जात नाहीत : संजय राऊत

Sanjay Raut on Sharad Pawar Statement: सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे, ती शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यामुळे. अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते, त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे, फूट पडली असं होत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि राजकारणात चर्चांना उधाण आलं. अशातच थोरल्या पवारांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटानं शरद पवारांची हकालपट्टी केली, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असा होतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजपसोबत हातमिळवणी केली, हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली. त्याचपद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्या पक्षानं अजित पवारांसह काही प्रमुख लोकांची हकालपट्टी केली. याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? फूट आहे.” 

[ad_2]

Related posts