Woman In Jharkhan Gives Birth To 5 Children At RIMS Ranchi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jharkhand News : झारखंडमधील (Jharkhand) रांची (Ranchi) इथल्या रिम्समध्ये (Rajendra Institute of Medical Sciences) सोमवारी (22 मे) एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला. ही बातमी रिम्स प्रशासनाने ट्विटर हॅण्डलवर शेअर केली. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयात हा चर्चेचा विषय ठरला आहे. चतरा जिल्ह्यातील इटखोरी येथील मलकपूर गावात राहणाऱ्या अनिता कुमारी यांनी एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिला आहे. सर्व नवजात बालकांचे वजन सुमारे एक किलो ते 750 ग्रॅम इतकं आहे. त्यानंतर नवजात बालकांना एनआयसीएयूमध्ये (NICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे. दरम्यान आई आणि बाळं निरोगी असल्याचं सांगण्यात येत आहे.

RIMS ने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “इटखोरी चतरा इथल्या एका महिलेने RIMS च्या महिला आणि प्रसूती विभागात पाच बालकांना जन्म दिला आहे. बाळ एनआयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉ.शशिबाला सिंह यांच्या नेतृत्वाखाली महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली.”

news reels Reels

अवघ्या 26 ते 27 आठवड्यात बालकांचा जन्म

नवजात बालकांचे वजन कमी असून ते प्रीमॅच्युअर आहे. त्यांचा जन्म 26 ते 27 आठवड्यात झालं असल्याने त्यांची काळजी घेतली जात आहे. किमान महिनाभर बाळांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सगळ्या बालकांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर बालकांच्या आईची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

नवजात बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी

सर्व नवजात बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आहे. या बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा खूपच कमी आहे. या मुलांची आई ही चतरामधील इटखोरीची रहिवासी असल्याची माहिती रिम्सने दिली. सध्या आई आणि बालकं दोघेही ठीक आहेत. डॉक्टरांचं पथक आई आणि बालकांवर लक्ष ठेवून आहे. या बालकांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज दिला जाईल, असं सांगितलं जात आहे.

RIMS मध्ये याआधीही महिलेकडून 4 बालकांना जन्म याआधी महिनाभरापूर्वी एका महिलेने रिम्समध्ये एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला होता. ही सर्व बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवलं आलं आहे.



[ad_2]

Related posts