Rain Update Villagers Pray To God For Rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rain Update : मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक भागांत पावसाने (Rain) यंदा दडी मारली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवस्था कोलमडून गेली असून, शेतकरीही संकटात सापडला आहे. अशात आता गावकरी पावसासाठी थेट देवाला साकडे घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठे नमाज अदा केली जातेय, कुठे दुवा मागितली जातेय, तर कुठे घागरयात्रा काढून महादेवाला साकडे घातले जात आहे. भर पावसाळ्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिके सुकायला लागली आहेत, पाणीटंचाईचे ढग घोंगायला लागले. त्यामुळे बळीराजा आता थेट देवाला पावसासाठी साकडं घालताना पाहायला मिळतोय. 

जालन्यात सामुहिक नमाज…

मराठवाडा तसेच राज्यात पावसाअभावी पिका बोरोबरच पिण्याच्या पाण्याच मोठं संकट दिसू लागलंय. यामुळे जालना येथे मुस्लिम बांधवांनी चांगल्या पावसासाठी अल्लाहकडे दुवा मागितली. शहरातील कदीम जालना हदगाव मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत चांगला पाऊस पडावा यासाठी ही प्रार्थना केली. दरम्यान, आजपासून तीन दिवस शहरातील वेगवेगळ्या ईदगाहवरती पावसासाठी नमाजी अदा करून ही प्रार्थना करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये विशेष नमाज…

नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कुठेही पाहिजे तसा पाऊस न झाल्याने खरिपाची पेरणी पूर्ण वाया गेली आहे. तर नद्या, नाले, विहिरी आदींसह धरणेही तळ गाठू लागली आहेत. अशातच पाऊस पडावा म्हणून नाशिकच्या लासलगाव येथे ‘अल्लाह’ला साकडे घालत जामा मशिदीचे ईमाम मौलाना सलाउद्दिन यांनी विशेष नमाज पठण केले. ‘या अल्लाह हमारे गलतियो को माफ कर, हमारी दुआ को कबूल कर दे और जमीन पर बारिश बरसा दे’ अशी प्रार्थना करण्यात आली. 

मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याच्या भीतीने बळिराजा हतबल झालाय. शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट आहे. पुन्हा दुष्काळी परीस्थितीला तोंड द्यावे लागते की काय? असा धडकी भरवणारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पैठणच्या पाचोड खुर्द येथील महाकालेश्वर महादेवाच्या मंदिरात गावातील नागरिक आणि महिलांनी हंड्याने पाणी नेवून जलाभिषेक घातला. महाकालेश्वर देवा पाऊस पडू दे, पिकपाणी जगू दे असे साकडे यावेळी घालण्यात आले. 

पैठणमध्ये करण्यात आली दुआ…

भरपावसाळ्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिके सुकायला लागली आहेत, पाणीटंचाईचे ढग घोंगायला लागले असल्याने चिंताजनक वातावरण आहे. यामुळे पैठणच्या आडूळ गावात मुस्लिम बांधवांनी जोरदार पाऊस पडावा यासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करत अल्लाहकडे पावसासाठी साकडे घातले. आडूळ गावातील खुल्या मैदानात असलेल्या ईदगाहवर ही नमाज अदा करण्यात आली. अल्लाह दयाळु आहे, तो पाऊस पाडून सर्वांना सुखी ठेवील म्हणत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. यावेळी आडूळ गावातील आणि परिसरात राहणाऱ्या अंदाजे 4 हजार मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन विशेष नमाज अदा केली. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

‘या मेरे अल्लाह करम फरमाना’, पावसासाठी मुस्लीम बांधवांची विशेष नमाज अदा; पाहा फोटो

[ad_2]

Related posts