Before Asia Cup Starts Two Players Of The Sri Lanka Cricket Team Were Infected With The Corona Virus ; Asia Cup मध्ये करोनाचे सावट, या संघातील दोन खेळाडूंना झाली लागण; स्पर्धा होणार की नाही?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो : आशिया चषक स्पर्धा आता काही दिवसांवर आला असताना संकटाचे ढग जमा झाले आहेत. कारण आशिया चषक स्पर्धेवर आता करोनाचे सावट असल्याचे समोर आले आहे. आशिया चषक स्पर्धा खेळणाऱ्या दोन खेळाडूंना आता करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या खेळाडूंचीही आता करोना चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे जर संघातील जास्त खेळाडूंना करोनाची लागण झाली असेल तर ही स्पर्धा होणार की नाही, असे संशयाचे ढग जमा झाला आहेत.

आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर आलेली असताना श्रीलंका संघातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो या करोनाबाधित खेळाडूंना सध्या निरिक्षणाखाली ठेवले असल्याचे वृत्त आहे. आशिया कप स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानात होणार आहे. यातील पहिला सामना ३० ऑगस्टला होईल, तर ३१ ऑगस्टला श्रीलंकेची सलामीची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

परेरा आणि फर्नांड यांच्यात करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यांना लंका प्रीमियर लीगमधील अंतिम टप्प्याच्या वेळी ही लागण झाली असल्याचा अंदाज आहे. निगेटिव्ह चाचणी आल्यावरच ते संघात पुनरागमन करतील. फर्नांडो जानेवारीपासून एकही सामना खेळलेला नाही. परेरा २०२१ पासून श्रीलंकेच्या संघाबाहेर होता. दुष्मंता चमीरा हा खांदा दुखावल्यामुळे या स्पर्धेत न खेळण्याची दाट शक्यता आहे. लंका प्रीमियर लीगच्या वेळी तो जायबंदी झाला आहे. या लीगपूर्वी त्याला घोट्याच्या दुखापतीने सतावले होते. तो जूनपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याच्या दुखापतीची सखोल तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम निर्णय होईल. वानिंदू हसरंगा हा साखळी सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामनाही तो जायबंदी असल्यामुळे खेळला नव्हता. वर्ल्ड कपचा विचार करून हसरंगाला साखळी सामन्याच्या वेळी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

श्रीलंकेचे बरेच खेळाडू या लीगमध्ये खेळले होते, त्यामुळे आता श्रीलंकेच्या संघातील सर्वच खेळाडूंची करोना चाचणी घ्यावी लागणार आहे.

[ad_2]

Related posts