Ahmednagar : श्रीरामपूरमध्ये चोरीच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला बांधून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
अहमदनगर: शेळी चोरी केल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार दलित तरूणांना झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती, मात्र शनिवारी ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या शुभम माघाडेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीच्या संशयावरून अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून काल शुक्रवारी सकाळी चार दलित तरूणांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. जखमी तरूणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक केली जावी अशी मागणी होत आहे.

सदर मारहाण प्रकरणी मारहाण करणारे युवराज गलांडे ,नानासाहेब गलांडे, राजू बोरगे, राजेंद्र पारखे, मनोज बोडखे आणी दुर्गेश वैद्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जखमी तरूणाची आई जेव्हा सोडवायली गेली तर तिलाही धक्काबुक्की करून बाजूला काढून देण्यात आलं असा आरोप जखमी तरुणाच्या आईने केला. तर आम्ही दलित असल्याने मारहाण केल्याचा आरोप जखमी तरूणाने केला आहे.

या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला असून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दवाखान्यात भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी शुभम माघाडे याच्या फिर्यादीवरून आरोपी युवराज गलांडे , मनोज बोडखे , पप्पू पारखे , दीपक गायकवाड , दुर्गेश वैद्य , राजू बोर्गे या आरोपी विरोधात भादवी कलम 307, 364, 342, 506, 504, 147, 148, 149 सह क अ.जा.अ.ज.1989 कलम 3(1) (a) (d), 3(2) (v-a), 3(I)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट इस्पितळात जात मारहाण झालेल्या तरुणांची भेट घेतली. यावेळी इस्पितळाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आगामी काळात लक्ष दिले जाईल अशी ग्वाहीसुद्धा दिली.

या घटनेनंतर रविवारी दलित संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आला आहे.  लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्याची मागणी होत असून कारवाईच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.

ही बातमी वाचा :

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये शरद पवार-अजित पवार गटात वादाची ठिणगी; दोन्ही गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या नामफलकाचा वाद पोलिस ठाण्यात

[ad_2]

Related posts