CSK VS Gt Qualifier 1 Hardik Pandya Wicket Video Viral; पंड्या चारी मुंड्या चीत, Dhoniचा मास्टरप्लॅन, फिल्डिंग बदलून धाडलं माघारी; Video तुफान व्हायरल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : जागतिक क्रिकेटमधील चपळ कर्णधारांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२३च्या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. धोनी मॅजिकपुढे विरोधी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हादेखील चारी मुंड्या चीत झाला. हार्दिक महत्त्वाच्या सामन्यात फक्त ८ धावांवर परतला.

चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ पहिल्या क्वालिफायर सामन्यात काल आमने-सामने होते. यावेळी सीएसकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने पाच षटकाचां खेळ खेळला होता. यावेळी हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल गुजरातचा डाव सावरत होते. अशात कर्णधार एमएस धोनी याने सहाव्या षटकात आपली चपळाई दाखवली आणि चेंडू महीश तीक्षणा याच्याकडे सोपवला.
Dhoni चा एक मास्टरस्ट्रोक ज्यानं गुजरातचा हुकमी एक्का मैदानाबाहेर, हार्दिकचं सगळं गणित बिघडून गेलं
तीक्षणाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि षटकातील पाचव्या चेंडूवर पंड्याच्या डावाचा शेवट केला. विशेष म्हणजे, हार्दिक ज्या चेंडूवर बाद झाला, त्याच्या एक चेंडू आधीच धोनीने लेग साईडहून क्षेत्ररक्षकाला हटवून ऑफ साईडला त्याच जागी उभे केले, जिथे पंड्याने झेल दिला. हार्दिक यावेळी ७ चेंडूंचा सामना करत ८ धावांवर परतला.

चेन्नईची बाजू

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सीएसकेने पहिल्या डावात ७ गडी गमावत १७२ धावा केल्या, ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड (६०) आणि डेव्हॉन कॉनवे (४०) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ बळी घेतले.

गुजरातची बाजू

दुसऱ्या डावात १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यांची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी विखुरली गेली. टायटन्स निर्धारित २० षटकात १५७ धावांवर सर्वबाद झाला आणि १५ धावांनी त्यांनी सामना गमावला. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर चेन्नईसाठी महीश तीक्षणाने चार षटकांत २८ धावा देत २ बळी घेतले.

चेन्नईतील अखेरचा सामना खेळल्यावर धोनी निवृत्तीबाबत स्पष्टच बोलला, फायनल खेळल्यावर…

[ad_2]

Related posts