Solapur News Approval Of Pandharpur Temple Development And Akkalkot Pilgrimage Development Plan State Summit Committee Meeting Decision

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : राज्य शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर (Pandharpur) मंदिर विकास आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत पंढरपूरसाठी 74 कोटी तर अक्कलकोटसाठी जवळपास 369 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. या अनुदानमुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं पंढरपूरचं (Pandharpur) विठ्ठल मंदिर, स्वामी समर्थांची नगरी असलेलं अक्कलकोट शहर सोलापूर जिल्ह्यातील या दोन महत्वाच्या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारो भाविक येतात. याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय राज्य शिखर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या राज्यातून लाखो भाविक येत असतात. 1995 साली अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच इतका भरीव निधी अक्कलकोटच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.  शिखर समिती राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी काम करते. 

अक्कलकोटमध्ये नेमकं काय होणार?

  • अक्कलकोट शहरात पार्किंगची मोठी सुविधा नसल्याने भाविकांचे मोठे हाल होतात. 
  •  त्यामुळे शहरात चार ठिकाणी नव्याने पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. 
  • यामध्ये सुमारे 2000 वाहने पार्क करता येतील अशी व्यवस्था करण्यात येईल
  •  दोन पालखी मार्ग आणि मंदिराकडे जाणाऱ्या सर्व जोड रस्त्यांचा विकास करण्यात येईल
  • सुमारे साडे सहा किलोमीटरच्या रस्त्याचा विकास प्रस्तावित
  •  पार्किंग आणि रस्त्यांच्या विकासासाठी नव्याने भूसंपादन करण्यात येणार असून त्यासाठी 91 कोटी रुपये आवश्यक आहेत 
  •  अक्कलकोट शहरात नऊ ठिकाणी भाविकांसाठी सार्वजनिक शौचालय उभे करण्यात येणार आहेत
  • अक्कलकोट शहरासाठी दहा एमएलडी इतका साठा होईल अशी पाणीपुरवठा योजना
  • शहरातील हत्ती तलाव आणि उद्यानांचा विकास प्रास्तावित
  • व्यापारी केंद्र आणि भक्त निवासाचा विकास
  • शहरातील प्रमुख चौक सुशोभीत करण्यात येणारं असून शहरात येणाऱ्या रस्त्यावर स्वागत कमानी

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  अक्कलकोटच्या विकासासाठी या आधी देखील विकास आराखड्याची चर्चा झाली, भरीव अनुदानाचे आश्वासन देऊन झाली. पण प्रत्यक्षात कधीही विकास कामे झाले नाहीत त्यामुळे या वेळीस तरी स्वामीच्या नगरीचा कायापालट होईल अशी अपेक्षा अक्कलकोटवासियांना आहे. 

हे ही वाचा :

 अयोध्येच्या राम मंदिराचं काम वगाने सुरु; 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा, बांधकाम समितीच्या अध्यक्षांची माहिती

[ad_2]

Related posts