Asia Cup 2023 Full Schedule On One Click ; Asia Cup 2023 मधील सामने कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धा आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. कारण आता बुधवारी (३० ऑगस्ट) पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पण आशिया चषकामध्ये कोणत्या देशाचे सामने कधी आणि कुठे होणार आहे, यासाठी संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे.

सुपर ४ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान
सुपर ४ मध्ये १० सप्टेंबरला पुन्हा मोठी लढत होऊ शकते. अ गटातील अव्वल २ संघ कोलंबोमध्ये भिडतील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा लढाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, १२ सप्टेंबर रोजी, अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ कोलंबोमध्ये ब गटातील अव्वल स्थानी असलेल्या संघाशी आणि १५ सप्टेंबरला ब गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी भिडणार आहे.

आशिया कप २०२३ चे पूर्ण वेळापत्रक:

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

३१ ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळ)

२ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळ)

३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दुपारी १:३० वाजता (भारतीय वेळ)

४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळ)

५ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळ)

६ सप्टेंबर: A1 वि B2, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळ)

९ सप्टेंबर: B1 वि B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१० सप्टेंबर: A1 वि A2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१२ सप्टेंबर: A2 vs B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१४ सप्टेंबर: A1 वि B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१५ सप्टेंबर: A2 vs B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१७ सप्टेंबर: TBC vs TBC, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

आशिया कपसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा. संजू सॅमसन (राखीव खेळाडू).

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

आशिया चषकात भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर २ सप्टेंबरला होणार आहे.

[ad_2]

Related posts