KL Rahul Ruled Out of First Two Matches of Asia Cup 2023 Confirmed by Coach Rahul Dravid; आशिया कपच्या आधी भारताला मोठा झटका; स्टार खेळाडू पहिल्या २ सामन्यातून बाहेर झाला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला पण आता पुन्हा एकदा संघात येण्यासाठी प्रयत्न करणारा केएल राहुल आशिया कपमधील सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी ही माहिती दिली. आशिया कपमध्ये भारताची पहिली लढत २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध तर दुसरी लढत ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. केएल राहुलच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी (पाकिस्तान आणि नेपाळ) तो उपलब्ध असणार नाही. द्रविड यांनी बेंगळुरू येथील भारताच्या सराव शिबिरानंतर ही माहिती दिली.

भारतीय संघासोबत तो श्रीलंका जाणार नाही. सध्या राहुल बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असेल. चार सप्टेंबर रोजी त्याच्या फिटनेसचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. जर तो फिट असेल तर श्रीलंकेला पोहोचेल. यामुळे पहिल्या दोन सामन्यासाठी राहुल उपलब्ध असणार नाही. याचा अर्थ राहुल सुपर ४ फेरीसाठी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा भारतीय संघाने पुढील फेरीत प्रवेश केला असेल. राहुल उपलब्ध नसल्याने ईशान किशन हा पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या लढतीत विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून संघात असेल.

आशिया कपसाठी राहुल उपलब्ध असेल याबाबत शंकाच होती. संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित अगरकर यांनी देखील राहुलला दुखापत असल्याचे सांगितले होते. त्याची आताची दुखापत ही पूर्वीची नाही. राहुलने आशिया कपसाठी अन्य खेळाडूंसोबत ६ दिवसाच्या फिटनेस शिबिरात भाग घेतला होता. मात्र त्याने यो-यो फिटनेस टेस्ट दिली नाही.

राहुलला आयपीएलमधील साखळी फेरीतील सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो मोठ्या कालावधीपासून मैदानातून बाहेर आहे. लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून तो श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत एनसीएमध्ये आहे. बुमराह आणि अय्यर हे दोघे फिट झाले. पण राहुलला पुन्हा नवी दुखापत झाली.

[ad_2]

Related posts