Asia Cup 2023 Pakistan Give Target 343 Runs Against Nepal Match 1 Innings Highlights Multan Cricket Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PAK Vs NEP, Innings Highlights : बाबर आझम आणि इफ्तिखार यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 342 धावांपर्यंत मजल मारली. बाबर आझम याने 151 धावांची खेळी केली तर इफ्तिखार अहमद याने 109 धावांचे झटपट योगदान दिले. नेपाळकडून सोमपाल याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. नेपाळपुढे विजयासाठी 143 धावांचे विराट लक्ष आहे. 

मुल्तान येथे आशिया चषकाचा दमदार शुभारंभ झाला. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  नवख्या नेपाळपुढे पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात परतले, पण बाबर आझम याने पाकिस्तानचा डाव सांभळला. बाबर आझम याने संयमी सुरुवात करत पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. इफ्तिखारसोबत बाबर आझम याने द्विशतकी भागिदारी केली. त्याशिवाय मोहम्मद रिझवान याच्यासोबत 86 धावांची भागिदारी केली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या 25 धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दीडशतक ठोकले. मोहम्मद रिझवान याच्यासोबत बाबर आझम याने 86 धावांची भागिदारी केली. मोहम्मद रिझवान 44 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आगा सलमानही स्वस्तात तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना बाबरने दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी सुरुच ठेवली होती. 

बाबर आझम याने इफ्तिखार अहमद याच्या साथीने पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. पाचव्या विकेटसाठी बाबर आणि इफ्तिखार यांनी 134 चेंडूमध्ये 214 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 300 धावांचा पल्ला पार केला. इफ्तिखार अहमद याने अवघ्या 71 चेंडूमध्ये 109 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चारषटकार आणि 11 चौकार ठोकले. बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.   

नेपाळच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. सलामी फलंदाज फखर जमान 14 आणि इमाम उल हक 5 धावा काढून तंबूत परतले. सलामीची जोडी लवकर परतल्यामुळे पाकिस्तान संघावर दबाव वाढला होता. पाकिस्तान संघ एकवेळ 27 षटकात चार बाद 124 अशा कठीण स्थितीत होता. पण इफ्तिखार अहमद याने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलले. बाबर आझम आणि इफ्तिखार यांनी नेपाळची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी द्विशतकी भागिदारी करत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचवले. 

नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केली. पण अखेरच्या 20 षटकात त्यांची लय गमावली. अखेरच्या 20 षटकात पाकिस्तान संघाने जवळपास 200 धावा चोपल्या. पाकिस्तानकडून सोमपाल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या. करन आणि संदीप यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

[ad_2]

Related posts