BCCI To Plant 500 Trees For Every Dot Ball Bowled During IPL 2023 Playoffs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BCCI Planting Tree Initiative : आयपीएलच्या सोळाव्या हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. यंदा बीसीसीआयने एक स्तुत्य उपक्रम राबवलाय. प्लेऑफमध्ये पडणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूवर 500 झाडे लावण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. गुजरात-चेन्नई या सामन्यात स्क्रीनवर निर्धाव चेंडूच्या जागी झाडे दिसून आली होती. त्यानंतर समालोचन करणाऱ्यांनी बीसीसीआयच्या उपक्रमाची माहिती दिली. 

समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी प्लेऑफच्या पहिल्या सामन्यादरम्यान बीसीसीआयच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. प्लेऑफमधील प्रत्येक निर्धाव चेंडूवर 500 झाडे लावण्यात येणार आहेत.. बीसीसीआयने यासाठी टाटा ग्रुपसोबत भागिदारी केली आहे. बीसीसीआय आणि टाटा ग्रुप प्रत्येक निर्धाव चेंडूवर 500 झाडे लावणार आहे. 

आयपीएल प्ले ऑफ सामन्यांमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी बीसीसीआय झाडे लावणार आहे.  प्रत्येक डॉट बॉलमागे टाटा समूह आणि बीसीसीआय 500 झाडं लावणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एकाच प्रश्न पडला आहे की संघासाठी धावा करायच्या का पर्यावरण संवर्धनासाठी डॉट बॉल खेळायचा?  फायनलपर्यंत किती निर्धाव चेंडू पडणार.. याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागलेय.

पहिल्या प्लेऑफ सामन्यात किती निर्धाव चेंडू ?

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि चेन्नईच्या गोलंदाजांनी 84 चेंडू निर्धाव फेकले.  म्हणजेच गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्यातून 42 हजार झाडे बीसीसीआयकडून लावण्यात येतील. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोण म्हणतेय, टी20 हा फलंदाजांचा खेळ आहे, असेही जय शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. प्लेऑफचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल या तीन सामन्यात किती निर्धाव चेंडू पडतात.. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा विजेतेपद पटकावणार?

चेन्नई संघ आयपीएल 2015 च्या फायनलमध्ये पोहोचले होते, परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल 2016 आणि आयपीएल 2017 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ खेळू शकला नव्हता. आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2019 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स संघ एका धावेनं पराभूत झाला. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये पोहोचले. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावलं. आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आणखी वाचा :

LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर



[ad_2]

Related posts