Will Contest 2024 Assembly Big Announcement Of BJP Legislative Council MLA Gopichand Padalkar Maharashtra Political Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Assembly Elections Election 2024: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) 2024 ची विधानसभा लढवणार आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून (Khanapur, Maharashtra Assembly Constituency) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. 2019 साली सांगली लोकसभेची वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) निवडणूक लढवलेल्या आणि नंतर भाजपमध्ये जात विधानपरिषदेची आमदारकी मिळवलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता थेट लोकांमधून निवडून येण्याचा निश्चय केला आहे. 

2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर-आटपाडी मतदारसंघातून आपण लढवणार असल्याची घोषणाच स्वतः गोपीचंद पडळकरांनी केली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर आपले होमपीच असलेल्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उतरणार असल्यानं एकीकडे त्यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. तर पडळकरांमुळे खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणुकीत टशन होणार आहे. कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर हे आहेत. सध्या अनिल बाबर शिंदे गटात आहेत. 

सध्या सत्तेत भाजप आणि शिंदे गट सोबत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार हे अद्याप निश्चित नसताना देखील गोपीचंद पडळकर यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. पडळकरांनी असं  करून एकप्रकारे मतदारसंघात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

1990 पासून आजी माजी आमदारांनी नुसतं राजकारणच केलं आहे. त्यांच्यासारखे टगेगिरीचे राजकारण आम्ही कधीच केलं नाही. टेंभू योजनेवर किती दिवस राजकारण करणार आहात? असा सवाल उपस्थित करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आजी-माजी आमदारांना ओपन चॅलेंजच दिलं आहे. मी तीन वर्षात केलेली कामं आजी-माजी आमदारांच्यापेक्षा जास्त आहेत, असं म्हणत येत्या 2024 ची निवडणूक मी लढवणार असून ती ताकदीने लढवून जिंकणार आहे. सर्वसामान्य लोकांची मागणी असल्यानं मी हा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा पडळकर यांनी केली आहे. खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे तामखडी ते ऐनवाडी 20 लाख रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. त्याचवेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lok Sabha Election 2024 : मोदींचे 200 तर काँग्रेसचे कर्नाटकात 2000, निवडणुकीच्या वर्षात महिलांसाठी भेटीचा वर्षाव

[ad_2]

Related posts