Asia Cup 2023 Cricket Rules In SL vs BAN Run Out Case ; Asia Cup 2023 : दोन्ही फलंदाज एकाच जागेवर, पण बाद कोण ठरला, जाणून घ्या नियम आहे तरी काय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. खेळपट्टीवरील दोन्ही फलंदाज एकाच जागी आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणाला बाद द्यायचे, हा प्रश्न पंचांपुढे होता. पण यावेळी पंचांनी क्रिकेटच्या नियमांनुसार एका फलंदाजाला बाद केले. पण रन आऊटचा हा नियम आहे तरी काय, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
नेमकं घडलं तरी काय…
ही गोष्ट घडली ती श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातील ३७ व्या षटकात. यावेळी बांगलादेशची फलंदाजी होती. बांगलादेशचा नजीमुल होसेन शांतो हा भन्नाट फटकेबाजी करत होता आणि त्याला साथ द्यायला मेहंदी हसन मिराज खेळपट्टीवर आला होता. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटले होते. पण ३७ व्या षटकात नको तेच घडले. या ३७ व्य षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शांतोने जोरदार फटका मारला आणि तो धाव घेण्यासाठी धावला. शांतो धावत नॉन स्ट्राइकला पोहोचला खरा, पण मिराज काही धाव घेण्याच्या तयारीत दिसत नव्हता. त्यामुळे शांतो आणि मिराज हे दोघेही एकाच ठिकाणी आले होते. त्यामुळे आता बाद कोणाला द्यायचा हा प्रश्न पंचांना पडला होता.

नियम नेमका काय सांगतो…
जेव्हा दोन्ही खेळाडू एकाच जागी असतात तेव्हा धाव घेत असताना जो खेळाडू अर्धी खेळपट्टी ओलांडतो त्याला दिलासा मिळतो. कारण त्याने अर्धी खेळपट्टी ओलांडलेली असते आणि दुसऱ्या खेळाडूने क्रीझ सोडले असते. हीच गोष्ट यावेळीही पाहायला मिळाली. शांतोने फटका मारला आणि त्याने अर्धी खेळपट्टी ओलांडली होती. दुसरीकडे मिराजने क्रीझ सोडले होते, पण त्याने अर्धी खेळपट्टी ओलांडली नव्हती. हे दोघेही जवळपास नॉन स्ट्रायकरच्या बाजूला उभे होते आणि बाद हे स्ट्राइयकरच्या बाजूला करण्यात आले. त्यामुळे ही गोष्ट पंचांनी तपासून पाहिली आणि त्यानंतर मिराजला बाद देण्याचा निर्णय देण्यात आला.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

या सामन्यात शांतोने दमदार फटकेबाजी करत सात चौकारांच्या जोरावर ८९ धावांची दमदार खेळी साकारली. शांतोच्या या खेळीच्या जोरावर बांगलादेशला १६४ धावा करता आल्या.

[ad_2]

Related posts