Ind Vs Pak Babar Azam Record In Odis Against India Embarrassing Could Not Score -half Century

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK Babar Azam Record : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना शनिवारी होणार आहे. पाकिस्तानने आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात 238 धावांनी विजय मिळवून दिमाखात सुरुवात केली. या सामन्यात कर्णधार बाबर आझम याने दीडशतकी खेळी करत भारताच्या गोलंदाजांना एकप्रकारे सावध राहण्याचा इशाराच दिलाय. जगातील अव्वल क्रमांकाच फलंदाज असलेल्या बाबरची भारताविरोधात निराशाजनक कामगिरी आहे. भारताविरोधात वनडेमध्ये मागील सहा वर्षांपासून बाबरला अर्धशतकही ठोकला आले नाही. 

पाकिस्तानच्या फलंदाजीचा स्तंभ मानला जाणाऱ्या बाबरला एकदिवसीय सामन्यात भारताविरोधात खास कामगिरी करता आली नाही. वनडेमध्ये भारताविरोधात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. 2017 मध्ये बाबरने भारताविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आजतागत त्याला एकाही अर्धशतक ठोकता आले नाही. धावांचा हा दुष्काळ आशिया चषकात दूर करणार का ? असा सवाल पाकिस्तानच्या चाहत्यांना सतावतोय. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षानंतर एकदिवसीय सामना होत आहे. गेल्यावेळीस हे दोन संघ 2019 च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात बाबर आझम याने 48 धावांची खेळी केली होती. ही त्याची भारताविरोधातील सर्वोत्तम खेळी आहे. 

भारताविरोधात बाबर प्रभावहीन

बाबर आझम याने पाकिस्तानसाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 104 वनडे सामन्यात बाबरने 60 च्या सरासरीने 5353 धावा केल्या आहेत. पण भारताविरोधात त्याला अर्धशतकही ठोकता आलेले नाही. भारताच्या गोलंदाजीसमोर बाबर संघर्ष करताना पाहायला मिळतो. भारताविरोधात पाच एकदिवसीय सामन्यात बाबर आझम याला 31.60 च्या सरासरीने फक्त 158 धावा करता आल्यात. 

वनडेमध्ये भारताविरोधात बाबरची कामगिरी कशी राहिली ?

2017 चॅम्पियन ट्रॉफी- 8 धावा

2017 चॅम्पियन ट्रॉफी- 46 धावा

2018 आशिया कप- 47 धावा

2018 आशिया कप- 9 धावा

2019 वर्ल्ड कप- 48 धावा

आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात दीडशतकी खेळी – 

आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात बाबर आझम याने धुवांधार फलंदाजी केली. बाबर आझम याने नेपाळची गोलंदाजी फोडून काढली. कठीण परिस्थितीत बाबर आझम याने धावांचा पाऊस पाडला. बाबर आझम याने 110 चेंडूत शतक झळकावले. त्यानंतर पुढील 20 चेंडूत त्याने 50 धावांचा पाऊस पाडला. बाबर आझम याने दीडशतकी खेळीमध्ये चार षटकार ठोकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आजम सध्या जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. पण भारताविरोधात त्याला आतापर्यंत अर्धशतकही ठोकता आले नाही. आशिया चषकात बाबर भारताविरोधात धावांचा दुष्काळ संपवणार का? की भारतीय गोलंदाज बाबर आझम याला पुन्हा स्वस्तात माघारी धाडणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

[ad_2]

Related posts