After a Big victory On Nepal shame for Pakistan In Asia Cup 2023 ; विजयानंतरही पाकिस्तानवर आली नामुष्कीची वेळ, आशिया कपमध्ये असं काय घडलं जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुलतान : पाकिस्तानने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने आशिया चषकाची सुरुवात दणक्यात केली खरी, पण या दमदार विजयानंतरही पाकिस्तानवर आता नामुष्कीची वेळ आलेली आहे.

पाकिस्तानचा पहिला सामान नेपाळबरोबर होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वर्ल्ड रेकॉर्ड रचला. या वर्ल्ड रेकॉर्डसह बाबरने या सामन्यात विराट कोहलीलाही मागे टाकले. बाबारने या सामन्यात १५१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्यामुळे पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ३४२ धावांचा डोंगर उभारता आला होता. त्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शादाबने चार विकेट्स घेत नेपाळला चांगलेच नाचवले. त्यामुळे पाकिस्तानला नेपाळचा १०४ धावांत खुर्दा उडवला आणि २३८ धावांनी दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानचा संघ चांगल्या आनंदात होता. पण या विजयानंतरही पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ आली आहे.

आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि नेपाळ सामना सुरू झाला, त्या वेळी अनेक स्टँड रिकामे होते. त्यामुळे पाकिस्तानच्या स्पर्धा संयोजनावर प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना होता, त्यात पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर खेळत होता. मात्र, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला, त्या वेळी खूपच कमी प्रेक्षक होते. स्पर्धेतील अवघे चार सामने पाकिस्तानात असूनही चाहते आले नाहीत. नेपाळच्या सामन्यांना त्यांच्या देशात चांगला प्रतिसाद लाभतो; पण पाकिस्तानात रिक्त स्टेडियमवर त्यांना खेळावे लागत आहे, असे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या डावातील निम्मी षटके झाल्यावर काही स्टँडमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली; पण स्टेडियम हाऊसफुल झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील चाहत्यांनी आशिया चषकाकडे पाठ फिरवल्याचे म्हटले जात आहे. कारण जर आपल्या देशाचा सामना आपल्याच मैदानात होत असेल तर प्रत्येक संघाचे चाहते गर्दी करतात. भारताचा सामना जगभरात कुठेही असला तरी तो हाऊसफुल्ल होत असतो. पण पाकिस्तानचा सामना सुरु असताना त्यांच्या देशांतील चाहत्यांनी मात्र स्टेडियममध्ये गर्दी केली नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यापुढे पाकिस्तानमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे की नाही, याचा विचार आता आशिया क्रिकेट कौन्सिलला करावा लागणार आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जय शहा आहेत.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी न केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता पाकिस्तानमधील सामन्यांच्या आयोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यामुळे आगामी तीन सामन्यांना तरी गर्दी होते करी नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts