After 30 years a wonderful combination is formed As Sun Saturn comes face to face these signs will be plagued with troubles

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsaptak yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य सिंह राशीत आहे. यासोबतच शनिही आपल्या राशी कुंभ राशीत आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही ग्रह एकमेकांपासून सुमारे 180 अंशांवर स्थित आहेत. या परिस्थितीत दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आहेत. त्यामुळे शनीची पूर्ण दृष्टी सूर्यावर पडतेय. 

दरम्यान शनि आणि सूर्य समोरासमोर आल्याने समसप्तक योग तयार होणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर असा योगायोग घडताना दिसतोय. दरम्यान शनी आणि सूर्य एकमेकांसमोर आल्याने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. जाणून घेऊया या योगामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना खास काळजी घ्यावी लागणार आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac Sign)

सूर्य आणि शनीच्या या स्थितीमुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा. घरात वादविवाद वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Zodiac Sign)

सूर्य आणि शनीच्या अशा स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. शनीच्या प्रत्यक्ष दृष्टीमुळे वैयक्तिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. जोडीदाराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे. 

कन्या रास (Virgo Zodiac Sign)

या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. यासोबतच अनावश्यक ताणतणाव टाळा. घरात अचानक कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतात. विनाकारण राग येणं अनेक मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. 

तूळ रास (Libra Zodiac Sign)

तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांची चणचण भासू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतरी तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts