Steve Waugh, Pat Cummins With Prime Minister Narendra Modi See In Pic

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi with Australian Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची फायनल होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. थांब… झालं काय… पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कमिन्स आणि मोदी यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, याआधीही ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला तोव्हा पॅट कमिन्सने मोदींची भेट घेतली होती. 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर गेले होते, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश होता. सिडनीमध्ये नरेंद्र मोदी यांनी काही बिजनेस लीडर्ससोबत बैठक होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातील काही दिग्गज खेळाडूंसोबतही भेट झाली. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स आणि माजी कर्णधार स्टीव वॉ याचा समावेश आहे. या भेटीचे फोटो समोर आलेत. 

पॅट कमिन्स भारताविरोधात खेळण्यास सज्ज आहे. सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. ओव्हल मैदानावर ही लढत होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि मोदी यांची भेट झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी इथे व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला  संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज  आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते. देशात, आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठी आणि उद्योग स्नेही वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा आणि उपक्रम यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. यात, पायाभूत दळणवळण सुविधा एकमेकांशी जोडण्यासाठीचे मिशन गती शक्ती अभियान, जन धन आधार मोबाईल त्रिसूत्री , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हायड्रोजन मिशन 2050, पीएलआय योजना, अवकाश आणि भू-अवकाश क्षेत्रे खाजगी गुंतवणूकीसाठी खुली करणे, वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी नवे धोरण, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना इत्यादीची माहिती दिली. पायाभूत सुविधा, ज्यात, डिजिटल पायाभूत सुविधासह पायाभूत क्षेत्र , माहिती तंत्रज्ञान, फीन-टेक, टेलिकॉम, सेमीकंडक्टर, अवकाश, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, शिक्षण, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग, कृषी आणि अन्नप्रक्रिया   क्षेत्रांमध्ये भारताने गुंतवणुकीच्या संधी खुल्या केल्या असून, सर्व कंपन्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले. या सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी भारतातील त्यांच्या समकक्ष कंपन्यांशी परस्पर लाभदायक अशी भागीदारी करावी, यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिले. 



[ad_2]

Related posts