IPL 2023 DJ Bravo Super Dance With CSK Players Elevating The Party Watch Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DJ Bravo Dance Viral : चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईने गतविजेत्या गुजरातचा पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलाय. या विजयानंतर चेन्नईच्या खेलाडूंवर कौतुकाचा वर्षाव होतोय. चेन्नईने दहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईच्या संघाने पाचव्या चषकाच्या दिशेने आगेकूच केली आहे. गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंना आनंद झाला.. डान्स करत सेलेब्रेशन करण्यात आले. लिफ्टमध्ये ब्राव्होसह सर्व खेळाडूंनी एकच कल्ला केला होता. 

आयपीएलमधील निवृत्तीनंतर ब्राव्हो सीएसके संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम करतोय. गोलंदाजी कोच म्हणून ब्राव्हो काम पाहतोय. चेन्नईसाठी ब्राव्हो आपले सर्वस्वी पणाला लावत असल्याचे अनेकदा दिसले..सामन्यानंतर ब्राव्होचा आनंद गगणात मावत नव्हता. सामन्यानंतर सर्व खेळाडूंनी आनंद साजरा केला. डान्स केल्याचे व्हिडीओ समोर आले. लिफ्टमध्ये ब्राव्हे आणि खेळाडूंनी डान्स केला. डिजे ब्राव्हो चॅम्पियन गाण्यावर सर्व खेळाडू थिरकताना दिसले. डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय.. 

पाहा व्हिडीओ…. 

चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश 

एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला.. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरले.

चेन्नईने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी हराकिरी केली. गुजरातचा डाव २० षटकात १५७ धावांत संपुष्टात आला. गुजरातकडून शुभमन गिल याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस राशिद खान याने ३० धावांची खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. पराभवानंतर आता गुजरातचा संघ क्वालिफायर २ मध्ये गेलाय. शुक्रवारी २६ मे रोजी गुजरातचा संघ अहमदाबादच्या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळेल.. लखनौ आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये गुजरातसोबत भिडणार आहे.

धोनीच्या चेन्नई संघाची ऐतिहासिक कामगिरी

हार्दिक पांड्याच्या गुजरातने यापूर्वी दोन सामन्यांमध्ये नऊ विकेट गमावल्या होत्या. आयपीएल 2022 मधील एका सामन्यात आणि यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये एका सामन्यात गुजरातने नऊ विकेट गमावल्या होत्या. पण चेन्नई सुपर किंग्सने ऐतिहासिक कामगिरी करत क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ तंबूत धाडला. या विजयासह चेन्नईने गुजरात विरोधात पहिला विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात याआधी चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने उतरले होते. याआधी गुजरात संघांने चेन्नई विरोधातील सर्व तीन सामने जिंकले. पण चौथ्या सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पहिल्यांदा पराभव केला



[ad_2]

Related posts