India Vs Pakistan Pervez Musharraf Sourav Ganguly When Pervez Musharraf Called Team India Captain Sourav Ganguly India Tour Of Pakistan In 2004 India Vs Pakistan Match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Pakistan,Pervez Musharraf Sourav Ganguly :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात  चार वर्षानंतर  एकदिवसीय सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की मैदानाबाहेरही वातावरण तितकेच गरम असते. त्याशिवाय अनेक रंजक किस्सेही घडतात. पाकिस्तानमधील एक किस्सा सौरव गांगुलीने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलाय. 2004 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती, तेव्हा घडलेला किस्सा आजही गांगुली विसरत नाही. गांगुलीला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी फोन केला होता. तर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्द होईल, असे का म्हटले होते..   त्यावेळी नेमकं काय घडले होते… सकाळी सकाळी मुशर्रफ यांनी गांगुलीला का केला होता फोन…. 

सौरव गांगुलीने ‘ए सेंचुरी इज़ नॉट इनफ’ या पुस्तकामध्ये परवेज मुशर्रफ यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे. भारतीय संघ २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या दौऱ्यात घडलेला प्रसंग सौरव गांगुलीने आपल्या पुस्तकात सांगितलाय. गांगुलीने आपल्या पुस्तकात म्हटले की,  2004 मध्ये आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा आमच्यासाठी खूप सुरक्षा ठेवण्यात आली होती. इतकी सुरक्षा मी कधीच पाहिली नव्हती, आम्ही लाहोरमध्ये एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्याला एक प्रकारे किल्ल्यातच रूपांतर केले होते. पण इतक्या कडेकोट सुरक्षेला चकवा देत मी बाहेर पडण्यात यशस्वी झालो होतो.  

सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन बाहेर जात मी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मला माहित होते. पण तेथून बाहेर निघणे गरजेचं होते. माझे काही मित्र पाकिस्तानच्या गावलमंडी येथे जाण्याचा प्लॅन करत होते. गावलमंडी पाकिस्तानमधील फेमस स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. मीही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला.  मी सुरक्षारक्षकांना याबाबत सांगितले नाही आणि फक्त संघ व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांना कळवून निघालो.  मी टोपी घातली आणि माझ्या मित्रांसोबत बाहेर पडलो. तिथे काही लोकांनी मला मार्केटमध्ये ओळखले आणि विचारले तू सौरव गांगुली आहेस की नाही… मी काहींना नकार दिला आणि ते म्हणाले की मी त्याच्यासारखा दिसतो, असे गांगुलीने म्हटलेय. 

या प्रसंगानंतर सौरव गांगुलीला सकाळी सकाळी ११ वाजता फोन आला होता. याबाबत गांगुलीने आपल्या पुस्तकात म्हटले की, सुरक्षारक्षा तोडून बाहेर गेलो होतो. त्यानंतर हॉटेलमध्ये परतलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला परवेझ मुशर्रफ यांचा फोन आला.  ते म्हणाले की, ‘तेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की थोडे स्वातंत्र्य हवे आहे, म्हणून ते निघून गेले. आतापासून हे करणार नाही.’ त्यावर गांगुलीने मुशर्रफ यांना सांगितले की, आम्हाला थोडे  स्वातंत्र्य हवे आहे, म्हणून बाहेर गेलो होतो. यापुढे असे होणार नाही.  

[ad_2]

Related posts