ISRO Ambitious Aditya L1 Mission What Is Exact Objective And Scientific Approach Behind This Mission

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ADITYA-L1 MISSION ISRO: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं यशस्वी लँडिंग केल्यानंतर, देशाच्या नजरा आता इस्रोच्या सूर्य मोहिमेवर म्हणजेच, आदित्य-एल1 वर आहेत. इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहीम PSLV-XL रॉकेटच्या मदतीनं 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे. लॉन्च झाल्यानंतर 127 दिवसांनी ते त्याच्या पॉइंट L1 वर पोहोचेल. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आदित्य-L1 सूर्य आणि तेथील परिस्थितीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा डेटा पाठवण्यास सुरुवात करेल.

मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, ‘आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून लॉन्च केली जाईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य L-1 या अंतराळयानाला L-1 बिंदूवर घेऊन जाईल. L1 हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच 15 लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 15 कोटी किलोमीटर आहे.

इस्रोचे प्रमुख पुढे बोलताना म्हणाले की, आदित्य एल-1 मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे. प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य-L1 ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस (SOI) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा जरा जास्त काळा चालेल. 

आदित्य-L1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) समाविष्ट केलं जाईल. जिथे L1 पॉईंट आहे. हा पॉईंट सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत तो फक्त 1 टक्के आहे. या प्रवासासाठी 127 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे अवघड मानलं जातं, कारण त्याला दोन मोठ्या ऑर्बिटमध्ये जावं लागतं.

इस्रोच्या आदित्य-L1 मिशनचं वैज्ञानिक उद्दीष्ट काय? 

आदित्य-L1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला Lagrangian पॉईंट L1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-L1 असं म्हटलं जात आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणं हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

सोलर कोरोना म्हणजे काय? (Stellar Corona)

कल्पना करा की, आपण सौर पृष्ठभागावर उभे आहोत, याला फोटोस्फियर (Photosphere) म्हणतात (सूर्यावर कोणताही ‘कठीण’ पृष्ठभाग नाही. तो फक्त उकळत्या वायूचा पृष्ठभाग आहे आणि त्यामुळे आपण त्यावर उभे राहू शकत नाही). त्यानंतर आपल्याला सूर्याचं वातावरण दिसतं, ज्याला क्रोमोस्फियर (Chromosphere) म्हणतात. हे घटक-समृद्ध आणि दाट आहे आणि वारंवार होणार्‍या Solar Flare उत्सर्जनामुळे पहिला धक्का बसतो. याशिवाय सूर्याचा सर्वात बाहेरचा थर हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. या बाह्य वातावरणाला कोरोना म्हणतात. ते प्लाझ्मानं भरलेलं असतं आणि सतत चमकत असतं. साधारणपणे सूर्याच्या तेजामुळे ते दिसू शकत नाही. परंतु, सूर्यग्रहणादरम्यान आपण सौर कोरोना कोणत्या उपकरणाच्या मदतीशिवाय अगदी सहज पाहू शकतो. 

सौर कोरोनाबद्दलचं रहस्य हे आहे की, त्याचे तापमान खूप जास्त आहे. फोटोस्फियर किंवा क्रोमोस्फियरपेक्षा कितीतरी जास्त. कल्पना करा की, हिवाळा सुरू आहे आणि खूप थंडी आहे, अशातच तुमच्या घरात हीटर चालू आहे. जसजसं तुम्ही हीटरपासून दूर जाल तसतसं तुम्हाला कमी उष्णता मिळेल. साहजिकच, एखादी वस्तू उष्णता स्त्रोतापासून जितकी दूर असेल तितकी ती थंड असते. पण कोरोनाच्या बाबतीत, जसं आपण सूर्यापासून दूर जातो, त्याचं तापमान वाढताना दिसतं, पण हे असं का होतं? हे अनेक वर्षांपासून न सुटलेलं रहस्य असून आतापर्यंते ते पूर्णपणे समजलेलं नाही. उत्तर कोरोनाच्या चुंबकीय क्षेत्र रेषांमध्ये कुठेतरी असू शकते. अडकलेले वायू विविध परस्परक्रियांमुळे गरम होऊ शकतात. त्यामुळे कोरोनल मास इजेक्शन समजून घेणं आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. कारण त्याचा पृथ्वीच्या हवामानावर थेट परिणाम होतो. अशातच इस्रोचं आदित्य L1 सोलर कोरोनाचं निरिक्षण करण्यासाठी अंतराळात जाणार आहे. 

[ad_2]

Related posts