Dhule Latest News Only 40 Percent Water Reserve Left In Dhule District, Protest To Declare Drought Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धुळे : राज्यातील बहुतांश जिल्हे तहानलेले असून ऐन पावसाळयात धरणे (Dams) कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकसह (Nashik) विभागातील जिल्ह्यामध्ये शेतकरी चिंतेत असून धुळे जिल्ह्यातही दुष्काळाची (Maharashtra Drought) परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 40 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तालुक्यात नागरिकांनी एकत्र येत दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको देखील केला आहे. 

धुळे जिल्ह्यात (Dhule District) जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता अद्याप पावसाची हजेरी (Maharashtra Rain) लागलेली नसून ज्यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली असून शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अत्यंत कमी साठा असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना भविष्यात करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान भविष्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या प्रश्नासह खरीप हंगामातील पिकांचा देखील प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचा देखील पिके जगवण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आहे.

धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण आणि भयावह आहे. पिके करपली. जलसाठे आटलेत जनावरांचा चाराही संपलाय. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करत शेतकरी बंधूंना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. रस्त्यावर उतरुन अजुन तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ शासनाने आणू नये. तात्काळ दुष्काळ जाहीर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम केला जाईल, असा इशारा यावेळी बोरकुंड गावाचे प्रथम माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी दिला.

धुळे जिल्ह्यातील जलसाठा 

धुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 40 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 25.44 टक्के कमी असून सद्यस्थितीत लघु आणि मध्यम प्रकल्पात 7.4 टीएमसी इतकाच साठा आहे, शहरात यंदा ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण 78 टक्के कमी झाले आहे. शहराला अक्कलपाडा आणि सुलवाडी प्रकल्पातून तर शिरपूर शहराला अनेर करवंद प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. शिंदखेडा शहराला सुलवाडी प्रकल्पातुन पाणीपुरवठा होत असतो. साक्री, पिंपळनेर ची मदार लाटीपाडा जामखेड प्रकल्पावर असून यंदा हे प्रकल्प 100 टक्के भरले आहे तर धुळे शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यात तब्बल 78 टक्के कमी पाऊस झाला असून जिल्ह्यातील 44 लघु प्रकल्पांपैकी 12 लघु प्रकल्प हे पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहे. 

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

धुळे तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी, शेतकरी बंधूंनो हवालदिल न होता परिस्थितीशी दोन हात करा, सर्व पर्याय संपले तरीही टोकाचे पाऊल मात्र उचलू नका, असे भावनिक आवाहनही केले. यावेळी बाळासाहेब भदाणे पुढे बोलताना म्हणाले की, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धुळे तालुक्यासह सर्वदूर बिकट परिस्थिती आहे. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करत गुरांसाठी चारा छावणी, पाण्याची समस्या असेल तिथे टँकरची सोय, शेतकरींना भरीव मदत आदींचे नियोजन करावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले. 

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts