Yavatmal Famer Suicide Cases Has Been Increased From Last Three Month Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

यवतमाळ :  जिल्ह्यात मागील तीन महिन्यांमध्ये 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide) म्हणून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येतो. पण सध्या या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ट्वीट करत चिंता व्यक्त केला आहे. 

आत्महत्येची आकडेवारी

यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून  तब्बल  93 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलंय. तर जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. यामध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे 40 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. जुलै महिन्यात  21 तर जून महिन्यात 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे या आत्महत्येचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 189 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलंय. 

ही बाब अत्यंत दुर्दैवी : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तब्बल 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खरीपाच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. नंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.”

जयंत पाटलांनी सरकावर देखील घणाघात केला आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, ‘निसर्गाने अवकृपा केली असताना, शासकीय पातळीवर देखील सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यात आता दुष्काळाचे भयानक सावट दिसत असल्याने नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे. ‘शासन आपल्या दारी’ चे मोठमोठे कार्यक्रम करून पैसा दिखाव्याकरीता वाया घालवण्यापेक्षा या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या दारी जरूर जावे.’

यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या प्ररकणाबाबत सध्या चौकशी करण्यात येत आहे. यामधील  38 प्रकरणांची चौकशी सध्या सुरु आहे. या चौकशीनंतर या संबंधी प्रशासनाची बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पात्र आणि अपात्र निकष ठरवून निश्चित आकडेवारी सांगण्यात येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

MLA Babandada Shinde : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, उजनीतून पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान : बबनदादा शिंदे



[ad_2]

Related posts