2nd September Headlines ISRO Aditya L-1 Lauch Maratha Kranti Morcha Sharad Pawar Maratha Protest

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2nd September Headlines :  आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. काही ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले असून काही ठिकाणी निषेध निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. 

 

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते.. मात्र आंदोलनकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. या घटनेवरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बीड, नंदूरबार जिल्हात बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक ठिकाणी आज निदर्शने होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 

शरद पवार, रोहित पवार जालना दौऱ्यावर

जालन्यात आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार जाणार आहेत. यावेळी ते आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार 

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.”

शिवसेना (उबाठा) आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई – आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ( उठाबा ) आणि युवासेनेच्या पदाधिका-यांची बैठक ( कार्यशाळा ) आज आयोजित करण्यात आली आहे. 

 
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नागपूरमध्ये मेळावा

नागपुर – प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात आज अजित पवार गटाचा पहिला मेळावा नागपूरमध्ये होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्ता मेळावे सुरू केले आहेत. विदर्भातील पहिला कार्यकर्ता मेळावा आज नागपूरात आहे. 

 

आज टीम इंडिया अन् पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला रंगणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आशिया चषक सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणार आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती

[ad_2]

Related posts