Mumbai Indians Enters In IPL 2023 Qualifier 2 After Winning MI vs LSG ; मुंबईचा नादच भारी, लखनौवर मोठा विजय साकारत क्वालिफायर २ मध्ये झोकात एंट्री

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : आकाश मढवालच्या गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत करून Qualifier 2 मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईच्या संघाने यावेळी लखनौपुढे १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या लखनौच्या संघाचे मुंबईला गोलंदाज आकाश मढवालने कंबरडे मोडले होते. पण फक्त मार्कस स्टॉयनिस मुंबईच्या विजयाच्या मार्गात होता. पण तो धावचीत झाला आणि मुंबईचा विजयचा मार्ग मोकळा झाला.मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून लखनौच्या संघाला धक्के द्यायला सुरुवात केली. आकाश मढवाल यावेळी मुंबईच्या संघासाठी मोठे यश मिळवून देत होता. कारण त्याने दुसऱ्याच षटकात लखनौला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर ख्रिस जॉर्डन आणि पीयुष चावलाही त्याच्या मदतीला धावून आले. आकाशने यावेळी निकोलस पुरन, आयुष बदोनी आणि प्रेरक मंकड या मॅचविनर खेळाडूंना बाद केले आणि मुंबईसाठी विजयाचा मार्ग प्रशस्त केला. प ण मार्कस स्टॉयनिस हा मुंबईच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर बनलेला होता.

इशान किशनने चौकारासह मुंबईची झोकात सुरुवात केली. त्यावेळीच मुंबईचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असल्याचे संकेत मिळाले होते. रोहितही यावेळी चांगल्या फॉर्मात दिसत होता. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे या सामन्यात रोहित मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण चांगली सुरुवात करूनही यावेळी रोहित व इशान यांना मोठी खेळी साकारता आली नाही. मुंबईला पहिला धक्का हा रोहितच्या रुपात बसला. रोहितला यावेळी १० चेंडूंत फक्त ११ धावाच करता आल्या. रोहितनंतर इशान किशनही लवकर बाद झाला. इशानने यावेळी १२ चेंडूंत १५ धावा केल्या. मुंबईला हे दोन्ही धक्के पाच षटकांपूर्वीच बसले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांची भागीदारी मुंबईसाठी महत्वाची ठरली. हे दोघेही अर्धशतकासमीप आले होते. त्यामुळे आता हे दोघे अर्धशतक झळकावतील आणि त्यानंतर ते मोठी खेळी साकारतील असे मुंबईच्या चाहत्यांना वाटत होते. पण या दोघांचेही अर्धशतक हुकले. सूर्याला यावेळी २० चेंडूंत ३३ धावा करता आल्या. सूर्या बाद झाला आणि त्यावेळी मुंबईची सर्व जबाबदारी ही कॅमेरून ग्रीनवर आली होती. कारण तो यावेळी सेट झालेला फलंदाज होता. पण मुंबईला याच षटकात अजून एक धक्का बसला. या षटकाच्या पाचव्या चेंडूंवर नवीन उल हकने ग्रीनला बाद केले आणि मुंबईचे कंबरडे मोडले. ग्रीनला यावेळी २३ चेंडूंत ४१ धावा करता आल्या.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला १८२ धावा करता आल्या.

[ad_2]

Related posts