Rohit Sharma Dropped Suryakumar Yadav And Choose Nehal Wadhera As Impact Player ; रोहितने सामना सुरु असताना दिला मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : रोहित शर्माने सामना सुरु असतानाच एक मोठा धक्का दिला. कारण सामना सुरु असताना रोहितने यावेळी सूर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्याचे पाहायला मिळाले. पण रोहितने असे का केले, याचे कारणही आता समोर आले आहे.सूर्या हा एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो. पण या सामन्यात मात्र सूर्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. सूर्याकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण सूर्याला यावेळी अर्धशतकही झळकावता आले नाही. त्यामुळे जेव्हा सूर्या बाद झाला त्यानंतर रोहितने एक मोठा निर्णय घेतला. रोहितने यावेळी सूर्याला संघाबाहेर काढले आणि त्याते कारणही त्याने स्पष्ट केले. ११ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने मोठा फटका मारला. त्यावेळी हा षटकार जाईल, असे वाटत होते. पण यावेळी सूर्याचे टायमिंग चुकले आणि त्याचा हा फटका जास्त हवेत उडाला. त्यामुळे हा षटकार जाणार की नाही, याची शंका चाहत्यांना वाटत होती. चाहत्यांची ही शंका खरी ठरली. कारण सूर्याचे टायमिंग चुकले आणि चेंडू हवेत जास्त उडाला. त्यामुळे सीमारेषेवर गौतमने झेल पडकला आणि सूर्या बाद झाला, सूर्याला यावेळी २० चेंडूंत ३३ धावा करता आल्या. मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. कारण सूर्या हा एकहाती सामना जिंकवणारा खेळाडू होता. पण मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला होता आणि मुंबईच्या धावाही कमी झाल्या होत्या. त्यामुळे रोहितने यावेळी सूर्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने संघात अजून एका खेळाडूला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईच्या धावा वाढवण्यासाठी रोहितने ही खेळी खेळली आणि त्यामुळे सूर्याला संघाबाहेर करत नेहाल वधेराला संधी दिली. वधेराने यापूर्वी धडाकेबाज फटकेबाजी केली होती. सूर्या गोलंदाजी करणार नव्हता. त्यामुळे रोहितने सूर्याला संघाबाहेर करत इम्पॅट प्लअर म्हणून वधेराची निवड केली.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस


सूर्या बाद झाला आणि काही वेळातच त्याला रोहित शर्माने संघाबाहेर केले. रोहितने असे काय केले, याचे कारणही आता स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Related posts