Asia Cup 2023 IND vs PAK India And Pakistan Record At Pallekele International Cricket Stadium ; IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घ्यावा? पल्लेकेल स्टेडियम कसे आहे? नाणेफेक होण्याआधी जाणून घ्या सर्वकाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कॅडी: आशिया कप २०२३ मध्ये आज महामुकाबला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी संघात होणाऱ्या लढतीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल. श्रीलंकेतील कॅडी येथे पल्लेकेल आंतरराष्ट्रीय मैदानावर ही लढत होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघात होणारी ही पहिली क्रिकेट मॅच आहे. मात्र दोन्ही संघांनी या मैदानावर याआधी अनेक सामने खेळले आहेत. टॉसच्याआधी जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानचे या मैदानावरील रेकॉर्ड कसे आहे.

पल्लेकेल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. या तिनही सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेचा पराभव केला होता. २०१२ साली झालेल्या सामन्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला होता. २०१७ साली झालेल्या दोन सामन्यात भारताने ३ आणि ६ विकेटनी विजय मिळवला होता.

पाकिस्तान संघाचा विचार केला तर त्यांनी या मैदानावर ५ लढती खेळल्या आहेत. त्यापैकी ३ मध्ये पराभव तर २ मध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ११० धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. २०११ साली पाकने झिम्बाब्वेचा ७ विकेटनी पराभव केला होता. २०१२ साली पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते, त्यापैकी एकामध्ये विजय तर दुसऱ्यात पराभव झाला होता. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा २ विकेटनी पराभव झाला होता.

मैदानाचे रेकॉर्ड कसे आहे

पल्लेकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आतापर्यंत ३४ वनडे मॅच झाल्या आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १४ वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने १९ वेळा विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २४८ तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २०१ इतकी आहे. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध ७ बाद ३६३ ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे. तर झिम्बाब्वेच्या नावावर ७० ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

टॉस जिंकणाऱ्या संघाने काय करावे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पावसाचे संकट आहे. अशा स्थितीत टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडेल. सुरुवातीला खेळपट्टीवर जलद गोलंदाजांना मदत मिळेल. त्याच बरोबर डकवर्थ लुईस नियम लागू झाला तर किती धावा करायचा हे देखील कळते.

[ad_2]

Related posts