रोहित शर्माच्या एका निर्णयाने मुंबईचा विजय पक्का, धोनीचे कनेक्शनही आता आले समोर – rohit sharma made big decision and mumbai indians victory was confirmed in ipl mi vs lsg eliminator, ms dhoni connection came in light

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : रोहित शर्माने या सामन्यात एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता मुंबईचा विजय पक्का होऊ शकतो. रोहितच्या या निर्णयामागे महेंद्रसिंग धोनीचे कनेक्शनही समोर आले आहे.मुंबई इंडियन्ससाठी हा सामना करो या मरो असाच असेल. कारण हा सामना मुंबईने गमावला तक त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पण जर मुंबईने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ते एक ठोस पाऊल टाकू शकतील. त्यामुळे मुंबईसाठी हा सामना महत्वाचा असेल आणि त्यासाठी रोहितने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. रोहितने या सामन्यासाठी एक असा निर्णय घेतला आहे की त्यामुळे आता मुंबईचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यामध्ये धोनीचे कनेक्शनही असल्याचे आता समोर आले आहे.

चेन्नईने गुजरातचा पराभव करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानातच झाला आणि तिथेच आता मुंबईचा सामना होत आहे. धोनीने यापूर्वीच सांगितले होते की, चेन्नईची खेळपट्टी ही संथ होत जाणारी आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर दुसऱ्यांदा जो संघ फलंदाजी करेल त्याला फटकेबाजी करणे सोपे नसेल, कारण या खेळपट्टीवर दुसऱ्यांना फलंदाजी करत असताना चेंडू संथपणे बॅटवर येईल आणि त्यामुळे वेगाने बॅट फिरवून मोठे फटके मारता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांची महत्वाची भूमिका असेल. त्यामुळे धोनीने चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळताना कधीही प्रथम फलंदाजी घ्यावी आणि ८-१० च्या षटका़मागील सरासरीने धावा कराव्या, जर एवढ्या धावा केल्या तर नक्कीच प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी ठरू शकतो. रोहितनेही आता धोनीच्या पावलावर पाऊल टाकले आहे, कारण रोहितने या सामन्यासाठी टॉस जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला होता आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

धोनी हा चाणाक्ष कर्णधार तर आहेच, पण त्याचा अन्य संघांनाही फायदा होतो. रोहितसारखा कर्णधार हा त्याच्याकडूनच किती शिकला आहे,याचे हे उदाहरण आहे.

[ad_2]

Related posts