Ind Vs Pak Asia Cup 202 Ishan Kishan S Brilliant Innings Against Pakistan Can Trouble Kl Rahul In World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ishan Kishan And KL Rahul : शनिवारी मोक्याच्या क्षणी इशान किशन याने दमदार अर्धशतक झळकावले. पाकिस्तानविरोधात भारताची फलंदाजी ढेपाळली होती, पण इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीने टीम इंडियाने कमबॅक झाले. भारतीय संघाने २६६ धावांपर्यंत मजल मारली. पावसामुळे हा सामना रद्द झाला. पण इशान किशन याने सर्वांची मने जिंकली.  केएल राहुल अनुपस्थितीत इशान किशन याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले होते. इशान किशन याने संधीचे सोनं करत अर्धशतकी तडका लावला. इशान किशनची ही वादळी खेळी केएल राहुलसाठी चिंतेची ठरली आहे. कारण, केएल राहुल याला कमबॅक करण्यासाठी आता इशान किशनची स्पर्धा करावी लागणार आहे. इशान किशनची जमेची बाजू म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. भारताच्या मध्यक्रम फलंदाजीत डावखुरा फलंदाज नाही… सातव्या क्रमांकावर येणाऱ्या जाडेजाचा अपवाद वगळता भारतीय संघात डावखुरा फलंदाज नाही. इशान किशन याने पाकिस्तानविरोधात केलेल्या दमदार खेळीमुळे आता राहुलच्या अडचणी वाढल्या आहेत. इशान किशन याला मध्यक्रममध्ये फलंदाजीला उतरवा, असा सल्ला दिला जातोय.  

पाकिस्तानविरोधात इशान किशन याने पाचव्या क्रमांकावर दमदार फलंदाजी केली. इशान किशन याने ८१ चेंडूमध्ये ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. कठीण परिस्थितीत इशान किशन याने संघाचा डाव सावरला. दहाव्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला होता, त्यानंतर गिल यानेही विकेट फेकली.. पण मोक्याच्या क्षणी इशान किशन याने वादळी खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात इशान बाद झाला. पण सुरुवातीला संयमी फलंदाजी करत हार्दिक पांड्याबरोबर भारताचा डाव सावरला. हार्दिक आणि इशान यांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी केली.  आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इशान किशन याने पाचव्या क्रमांकावर सुरुवातीला संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढली. जम बसल्यानंतर चौकार आणि षटकार मारले. केएल राहुल यासाठीच ओळखला जातो, ते का इशान किशन याने केलेय. त्यात इशान किशन डावखुरा असल्यामुळे संधी वाढते. 

राहुलचा पत्ता कट झाला ?

इशान किशनची पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी केएल राहुलला नक्कीच अडचणीत टाकणारी आहे.  पाकिस्तानसारख्या भेदक गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध इशान याने जिगरबाज खेळ केला. इशानने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी यष्टिरक्षक म्हणून दावा केला आहे. केएल राहुलला विश्वचषकासाठी पहिली पसंती यष्टिरक्षक म्हणून ओळखले जात होते. पण आता इशान किशन यानेही आपली दावेदारी पेश केली आहे. 

इशानची निवड दुसरा विकेट म्हणून केली जाणार असली तरी आता तो केवळ पर्यायी यष्टिरक्षक म्हणून दिसणार नाही. पाकिस्तानविरुद्ध इशानची शानदार खेळी निवडकर्त्यांना नक्कीच विचार करायला लावणारी आहे. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे. अशा स्थितीत त्याच्या लय आणि मॅच फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

[ad_2]

Related posts