HSC Result 2023 LIVE 12th Result Today What To Do To Check Results Quick Here On ABP Majha Website Mh12.abpmajha.com HSC Result 2023 Online Link

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Board HSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC Result 2023) कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. अशातच काल बोर्डाकडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर (12th Result) करण्यात आली आहे. आज 25 मे 2023, गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार असून निकालासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात येणार आहे. तसेच, विभागनिहाय टक्केवारीही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता बारावीचे विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. 

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी आपला निकाल अगदी सहज पाहू शकतील. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असतील तर त्यासाठी 26 मे ते 5 जूनपर्यंत बोर्डाकडून मुदत देण्यात आली आहे. 

Maharashtra HSC Result 2023 Date : कुठे पाहाल निकाल? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, गुरूवारी 25 मे रोजी रोजी जाहीर होणार आहे. दुपारी  दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना  ‘ABP Majha’च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट mh12.abpmajha.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर झटपट निकाल पाहण्यासाठी काय कराल? 

एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा 

स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra HSC Result 2023: ALL THE BEST!! आज बारावीचा निकाल; दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार, झटपट निकाल ABP Majha वरही पाहता येणार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts