Maharashtra News Serious Allegation On Sadavarte Panel Cooperative Commissioner For Withdrawing Deposits Of 110 Crores

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : एसटी बँकेसंदर्भात (ST Bank) सहकार आयुक्तांकडे एका सभासदानं गंभीर तक्रार केलीये. सदावर्ते पुरस्कृत संचालक मंडळानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँक डबघाईला येत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी या सभासदानं केली आहे. नवं संचालक मंडळ एसटी बँकेत आल्यावर अंदाजे 110 कोटींच्या ठेवी काढण्यात आल्याचा उल्लेख सभासदानं आपल्या पत्रात केला आहे. 

नव संचालक मंडळ स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह  बँकेवर आल्यानंतर अंदाजित 110 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याचा  दावा एका सभासदाने केला आहे. बँकेचा पतगुणोत्तर (क्रेडिट डिपॉझिट रेशो) 85 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.य आरबीआयच्या नियमांनुसार हा रेशो 72 टक्क्यांपर्यंत असायला हवा मात्र तो अधिक असल्यानं बँकेत आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 

 स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप.बँकेत जवळपास 2 हजार 300 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नव संचालक मंडळ आल्यानंतर एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर कंत्राटी नव्या एमडी पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. या पदासाठी अनुभव गरजेचा असताना एका 22 वर्षीय अननुभवी तरुणाला संधी दिल्याचा आरोप  देखील करण्यात आला आहे. 

70 वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला

जवळपास काही वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेवर वर्चस्व होतं. सदावर्ते पॅनलने सत्ता मिळवल्यानंतर बैठकींमध्ये मांडलेल्या ठरावांवरून वाद निर्माण होत होते. संचालकांच्या मनमानीला कंटाळून महाव्यवस्थापकांनी देखील राजीनामा दिला.  एसटी बँकेत जुलै  महिन्यात नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले.  परंतु या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने आणि चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे 70 वर्षे कार्यरत असणारी बँक डबघाईला येत आहे. 

संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेतून 15 दिवसात 110 कोटी ठेवीदारांनी काढून घेतले आहेत. बँकेचा क्रेडिट रेशो 85 टक्क्यांवर गेला आहे. सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची आयुष्याची सेवानिवृत्तीनंतरची पुंजी या बँकेत आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयामुळे बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. 

एसटी आंदोलनानंतर ह्या बँकेवर कोणाची सत्ता येईल यासंदर्भात मोठी उत्सुकता होती. एसटी आंदोलनामुळे जसं सर्वसामान्यांचे नुकसान झाले तसे ते बँकेचे देखील झाले. एसटी विलिनीकरणासंदर्भात सदावर्ते हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून भाष्य करत नाहीत. गुणरत्न सदावर्तेयांच्या एसटी कष्टकरी संघटनेचं एसटी महामंडळात वर्चस्व वाढतंय. अशात एसटी बँकेवर देखील एकहाती सत्ता मिळवल्याने सदावर्ते यांचं एसटी कर्मचाऱ्यांवरचं गारूड अजूनही कायम असल्याचं दिसतंय. 

हे ही वाचा :

मराठवाड्याला जाणार असाल तर थांबा; जालन्यातील घटनेनंतर पुणे, सांगली,औरंगाबाद, पंढरपूर, नगरहून सुटणाऱ्या एसटी बस रद्द

 

[ad_2]

Related posts