[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Caribbean Premier League 2023 : 143 किलो वजनदार फलंदाजांच्या खेळीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. होय… वेस्ट इंडिजच्या रहकीम कॉर्नवाल याने कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत वादळी फलंदाजी करत लक्ष वेधलेय. वेस्ट इंडिजमध्ये सध्या कॅरेबिअन प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवाल याने अवघ्या 45 चेंडूमध्ये शतकी खेळी केली. यामध्ये त्याने 12 खणखणीत षटकार ठोकले. 143 किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवाल याच्या धुवांधार खेळीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. सीपीएल (कॅरेबिअन प्रीमिअरलीग) रहकीम कॉर्नवाल याच्या खेळीमध्ये चर्चेत आलेय.
कॅरेबिअन प्रीमियर लीग स्पर्धेत रहकीम कॉर्नवाल बारबाडोस रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सीपीएलमध्ये रहकीम कॉर्नवाल याने सेंट किट्स याच्याविरोधात वादळी फलंदाजी करत शतकी तडाखा लावला. रहकीम कॉर्नवाल याने 48 चेंडूमध्ये 212.50 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 102 धावांचा पाऊस पाडला. रहकीम कॉर्नवाल याने आपल्या वादळी खेळीमध्ये 12 गगनचुंबी षटकार आणि 4 खणखणीत चौकार ठोकले. रहकीम कॉर्नवाल याने आपले शतक फक्त 45 चेंडूत पूर्ण केले.. रहकीम कॉर्नवाल या सामन्यात बाद झाला नाही… तो रिटायर हर्ट होऊन तंबूत परतला.
रहकीम कॉर्नवालचा संघाचा विजय
सेंट किट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल. सेंट किट्स यांनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 220 धावांचा डोंगर उभारला. सेंट किट्स संघाकडून कर्णधार शेरफेन रदरफोर्ड याने सर्वात मोठी खेळी केली. त्याने 27 चेंडूमध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 65 धावांचा पाऊस पाडला. रदरफोर्ड याचा स्ट्राइक रेट 241 इतका राहिला. त्याशिवाय सलामी फलंदाज विल स्मेड याने 63 आणि आंद्रे प्लेचर याने 56 धावांचे योगदान दिले. विल स्मेड याने पाच चौकार आणि 4 षटकार ठोकले तर फ्लेचर याने सात चौकार आणि एक षठकार ठोकला.
सेंट किट्स यांनी दिलेले 221 धावांचे आव्हान बारबाडोस रॉयल्स संघाने आरामात पार केले. बारबाडोस रॉयल्स संघाने 18.1 षटकात अवघ्या दोन विकेटच्या मोबदल्यात 221 धावांचे आव्हान पार केले. रहकीम कॉर्नवाल याने बारबाडोस रॉयल्स संघासाठी शतकी खेळी केली. अवघ्या 45 चेंडूत रहकीम कॉर्नवाल याने सामन्याचा निकाल फिरवला. बारबाडोस संघाने चौथ्या षटकात काइल मेयर्सच्या रुपाने विकेट गमावली होती. काइल त्यानंतर रहकीम कॉर्नवाल याने आपली वादळी फलंदाजी करत बारबाडोस संघाला विजयाच्या दारात नेले. रहकीम कॉर्नवाल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[ad_2]