India Squad For ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Lead Indian Cricket Team Latest Marathi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India ODI World Cup Squad 2023 : भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार… हे जवळपास निश्चित झालेय. आशिया चषकात खेळणाऱ्या 17 जणांच्या संघामधूनच 15 खेळाडू निवडले जाणार असल्याचे रिपोर्ट्सने सांगितलेय.

कुणाला मिळणार विश्वचषकाचे तिकिट – 

रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकाच्या रनसंग्रामात सहभागी होण्यासाठी टीम इंडियाचे 15 शिलेदार निश्चित झाले आहेत. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने 15 जणांची निवड केली आहे. दोन नावांवर चर्चा सुरु असल्यामुळे संघाची घोषणा करण्यास उशीर होत असल्याचे समोर आलेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली,  जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे. 

अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. बीसीसीआय विश्वचषकासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे. संघ निवडीसाठी पाच सप्टेंबर अखेरची तारीख आहे.  भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे. 

2023 वनडे वर्ल्ड कपसाठी भारताचे संभावित 15 शिलेदार – 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (रिजर्व विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

 Rohit Sharma (Captain), Hardik Pandya (vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Axar Patel, Ishan Kishan, Suryakumar Yadav. 

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 8 ऑक्टोबरपासून भारत आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.

[ad_2]

Related posts