Indian Men’s TT Team Assured Sharath Kamal Izaac Quek Bronze Medal At Asian Championships Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Table Tennis Team Assured Medal At Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय टेबल टेनिस संघाने आपले एक पदक निश्चित केले आहे. आज सिंगापूरविरोधात झालेल्या क्वॉर्टर फायनल सामन्यात भारताने विजय मिळवत कांस्य पदक निश्चित केलेय. भारताच्या टेबल टेनिस संघाने सिंदापूरवर एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाने 3-0 च्या फरकाने विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. शरत कमल याने सिंगापूरच्या इजाक क्वेक याचा दारुण पराभव केला. शरत कमल याने इजाक क्वेक याच्याविरोधात पहिला एकेरी सामना 11-1, 10-12, 11-8, 11-13 आणि 14-12 अशा फरकाने जिंकला. या विजयानंतर भारताने पुढील सामन्यात कियोन पांग याचा पराभव केला. भारताच्या के जी साथियान याने यू एन कियोन पांग याचा 11-6, 11-8, 12-10 अशा फरकाने पराभव करत सामना भारताच्या नावावर केला. तिसऱ्या सामन्यात हरमीत देसाई याने झे यू क्लारेंस च्यू याला 11-9, 11-4 आणि 11-6 असा पराभव करत पदक पक्के करण्यात मोलाची भूमिका बजावली. 

आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा सामना आता चीनी तायपै अथना इराणच्या संघासोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याचा निश्चय भारतीय संघाने केला आहे. भारतीय संघ विजयासाठी प्रयत्न करेल, असे खेळाडूंनी सांगितलेय. टेबल टेनिस संघाने यापूर्वी दोन वर्षांपूर्वी दोहा येथे कांस्यपदक जिंकले होते. 

आपला सामना जिंकल्यानंतर शरथ कमल म्हणाला होता की, इजाकने मला चौथ्या गेममध्ये चांगली लढत दिली. पण जमेची बाजू म्हणजे मी पाचव्या गेममध्ये पुनरागमन केले आणि सामना जिंकला. या विजयानंतर भारताच्या टेबल टेनिस संघाचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महिला संघाचे निराशाजनक प्रदर्शन – 

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. तिन्ही एकेरीच्या सामन्यात भारताचा जपानकडून पराभव झाला. भारतीय महिला संघात मनिका बत्रा, सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा समावेश होता. भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता पुरुष संघाकडून पदकाच्या आशा जिवंत आहे. भारतीय संघाने कांस्य पदक निश्चित केलेय.. पण सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यास भारतीय संघ सुवर्णपदकावर नाव कोरु शकतो. 



[ad_2]

Related posts