Asia Cup 2023 IND Vs NEP Live He Rain Has Again Interrupted The Match At Pallekele Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023 IND vs NEP Live : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला आहे. जवळपास तासभरापासून कँडीमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. संपूर्ण मैदान कव्हर्सनी झाकण्यात आले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जर सामना सुरु झाला तर भारताला किती टार्गेट मिळणार.याबाबतची चर्चा सुरु आहे. याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत… जर 45 षटकांचा सामना झाला तर भारताला 220 धावांचे आव्हान मिळेल. 40 षटकांचा सामना झाल्यास 207, 35 षटकांचा सामना झाल्यास 192 धावांचे आव्हान मिळेल. 30 षटकांचा सामना झाला तर 174 आणि 20 षटकांचा सामना झाला तर 130 धावांचे आव्हान मिळू शकते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पल्लेकल येथे झालेला सामनाही पावसामुळे प्रभावित झाला होता. दोन्ही संघातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यातआ ले होते. पावसाने सध्या विश्रांती घेतल्याचे दिसतेय. मैदानावरुन कव्हर्स काढण्याचे काम सुरु झाले आहे. कव्हर्स काढल्यानंतर पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. पावसामुळे सामना थांबला तेव्हा रोहित शर्मा 4 तर शुभमन गिल 12 धावांवर खेळत आहेत. भारताने बिनबाद 12 धावा केल्या आहेत. 

नेपाळने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 231 धावांचे आव्हान दिले आहे. नेपाळने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि गिल जोडीने दमदार सुरुवात केली. पण 2.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर वरुणराजाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. सामना पुन्हा सुरु होणार का ? याचा निर्णय पंच घेतली. खेळपट्टी आणि मैदानाची स्थिती पाहून पंच सामना सुरु करण्याबाबत निर्णय घेतील. जर सामना सुरु कऱण्याची परिस्थिती नसेल तर रद्द करण्यात येईल. भारताचा हा सामनाही रद्द झाल्यास भारतीय संघाचे दोन गुण होतील. भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळचे आव्हान संपुष्टात येईल. 

नेपाळची झुंजार फलंदाजी –

आसिफ शेख याचे अर्धशतक आणि सोमपाल कामी याच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने 230 धावसंख्येपर्यंत मजल मारली. आसिफ शेख याने 58 धावांची झुंजार खेळी केली तर सोमपाल कामी याने वादळी 48 धावा कुटल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान आहे. भारताच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत नेपाळला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. पण सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. रोहित शर्मा 4 तर शुभमन गिल 12 धावांवर खेळत आहेत. भारताने बिनबाद 12 धावा केल्या आहेत. 



[ad_2]

Related posts