Asia Cup 2023 Asian Cricket Council Confirms Super 4 And Final Will Be Played At Colombo

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023 : श्रीलंकामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आशिया चषकातील सामने प्रभावित झाले. भारत-पाकिस्तान आणि भारत-नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला होता. भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना तर रद्द करावा लागला. मुसळधार पावसामुळे आशिया चषकातील सुपर 4 सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला आहे. कँडी आणि दांबुला येथे होणारे सामने कोलंबो येथे शिफ्ट करण्यात आले आहेत. ग्रुप अमधून पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत. ग्रुप ब मध्ये चुरशीची लढत सुरु आहे. श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर ब गटाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

पाहा सुपर 4 स्पर्धेचे वेळापत्रक










6 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) पाकिस्तान vs B2 लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) B1 vs B2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) पाकिस्तान vs टीम इंडिया कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) टीम इंडिया vs B1 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) पाकिस्तान vs B1  कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) टीम इंडिया vs B2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता

ग्रुप ब मध्ये रनरेट महत्वाचा –

ग्रुप ब मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक एक विजय मिळवला आहे. श्रीलंका संघाने बांगलादेशचा पराभव केला होता. तर बांगलादेश संघाने आफगाणिस्तानचा पराभव करत सुपर4 च्या दिशेने पाऊल टाकलेय. आज श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यात निर्णायक लढत होणार आहे. बांगलादेश संघाने दोन सामन्यात एका विजयासह 2 गुणांची कमाई केली आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीलंकेवर बाहेर जाण्याचे संकट ओढावलेय. आफगाणिस्तान संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर गतविजेत्याचे आव्हान संपुष्टात येईल. सध्याच्या घडीला श्रीलंकेचा रनरेट 0.951 इथका आहे. तर आफगाणिस्तानचा रनरेट -1.780 इतका आहे. 

भारताचे सुपर 4 फेरीचे वेळापत्रक – 

ग्रुप अ आणि ब मधील आघाडीचे दोन संघ सुपर 4 साठी पात्र होतील. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये पात्र झाले आहेत. आज ग्रुप ब चे चित्र स्पष्ट होणार आहे. सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ प्रत्येकासोबत एक एक सामना खेळणार आहे. म्हणजे, सुपर 4 मध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. आघाडीच्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. भारतीय संघाचे सुपर 4 मधील सामन्याची तारीख आता निश्चित झाली आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी आणि अखेरचा लाममा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. 12 आणि 15 सप्टेंबर रोजी होणारे सामने ग्रुप ब मधील आघाडीच्या दोन संघाविरोधात असतील. 

ग्रुप अ मधील आघाडीच्या दोन संघातील शिलेदारांची संपूर्ण यादी – 

आशिया चषकासाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ 

अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, इमाम उल-हक, बाबर आजम (कप्तान), सलमान आघा, टी. ताहीर, साऊद शकील, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, फहीम अशरफ, हारिस राउफ, मोहम्मद वसीम जूनियर, नादिर शाह, शाहीन आफ्रिदी.



[ad_2]

Related posts