वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली अन् दुसऱ्या क्षणाला स्फोटक खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. भारतासोबतच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने देखील वर्ल्डकपसाठीचा संघ जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर झाल्यानंतर काही मिनिटातच एका खेळाडूने धक्कादायक निर्णय घेतला ज्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि विकेटकीपर क्विंटन डी कॉकने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या वर्षी ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात वर्ल्डकप होणार आहे. ३० वर्षीय डी कॉकने २०१३ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १४० वनडेत ४८.८५च्या सरासरीने ५ हजार ९६६ धावा केल्या आहे. यात १७ शतक आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटकीपर म्हणून डी कॉकने १९७ विकेट घेतल्या असून ज्यात १८३ कॅच आणि १४ स्टपिंगचा समावेश आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
डी कॉकने वनडे क्रिकेटची धमाकेदार सुरुवात केली होती. वनडेमध्ये सर्वात वेगाने १ हजार धावा करणारा तो चौथा फलंदाज होता. त्याने २१ डावात हा टप्पा पार केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१६ साली त्याने १७८ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. कसोटीतून २०२१ साली निवृत्ती घेणारा डी कॉक आता वनडे अखेरची स्पर्धा खेळणार आहे.

वर्ल्डकप संघ जाहीर, निवड न झालेल्या खेळाडूंची चर्चा अधिक; चांगली कामगिरी, दमदार रेकॉर्ड तरी यांना नशिबाने दिला दगा
क्विंटन डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी खरोखरच चांगली सेवा केली आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने बेंचमार्क सेट केला आणि अनेक वर्षे तो संघाचा प्रमुख सदस्य होता. त्याने कर्णधाराची जबाबदारी स्विकारली होती हा एक सन्मान आहे जो फार कमी लोकांना मिळतो, असे बोर्डाचे संचालक एनोक एनक्के म्हणाले.

दक्षिण आफ्रिकाला अद्याप एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. आता या वर्षी तरी ते जिंकतात का याची उत्सुकता सर्वांना आहे. अखेरचा वर्ल्डकप खेळणारा डी कॉक देशाला पहिले विजेतेपद मिळून देण्यास नक्कीच उत्सुक असेल.

[ad_2]

Related posts