HSC Result Buldhana Paper Leak And Chhatrapati Sambhajinagar Physics Paper Sacm Education Board News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

HSC Result 2023: बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरी या वर्षी पेपरफुटीमध्ये ही परीक्षा मात्र चांगलीच चर्चेत आली. बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटला आणि त्याचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले. कॉपीमुक्त अभियान राबवला जात असताना दुसरीकडे मात्र परीक्षेचाच बोजवारा उडाल्याचं चित्र होतं. बुलढाण्यातील या पेपरफुटीच्या (Buldhana Paper Leak) प्रकरणात शाळेतील चार शिक्षकांचाच समावेश असल्याचं स्पष्ट झालं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपपत्रिकेवर दोन वेगवेगळी हस्ताक्षर असल्याचं समोर आलं आणि त्यावरुन गोंधळ निर्माण झाला होता. 

Buldhana Paper Leak  : बुलढाण्यातील निकाल जाहीर 

बुलढाण्यातील गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. यामधे विद्यार्थ्यांचा समावेश नाही. त्यानंतर आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर येताच राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती . गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 36 तासात सात आरोपींना अटक केली असून यातील चार आरोपी हे खाजगी शाळेतील शिक्षक असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या 372 विद्यार्थ्यांचं काय? 

बारावीच्या परीक्षेच्या फिजिक्सच्या पेपरदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील 372 विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने एक समिती नेमली होती. शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीने प्रथमदर्शनी मुलं दोषी नसल्याचे सांगत आज अखेर त्यांचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाकडून सोयगाव तालुक्यातल्या फरदापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी इतर दोषींवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. छत्रपती  संभाजीनगरमधील 372 विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत पुनर्लेखन (ओव्हर रायटिंग) झाले. या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

15 मे नंतर बोर्डासमोर केंद्रप्रमुख, केंद्रसंचालक, कस्टडियन, प्रवेक्षक,मॉडरेटर आदींची चौकशी झालीय, दरम्यान या काळात सदर उत्तर पत्रिकेमध्ये दुसरे हस्ताक्षर आपलं नसल्याचं विद्यार्थ्यांनी लेखी उत्तर बोर्डाकडे सादर केला होत. सदर उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील दोन शिक्षकांकडे गेल्याची माहिती आहे. त्या नुसार संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 

आता पोलीस तपासातच हे दुसरे हस्ताक्षर कोणाचे, यात काही आर्थिक व्यवहार झालेत का किंवा यात प्रामुख्याने कोणत्या संस्था. कोणते शिक्षक अथवा अधिकारी गुंतलेत का याचा तपास करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर आता तपासानंतर मिळणार आहे.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts