[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Political Updates: आगामी काळात राजस्थानच्या विधानसभा निवडणुका (Rajasthan Legislative Assembly Election 2023) पार पडणार आहेत. अद्याप निवडणुकांचं बिगुल वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेस (Congress News) सत्ता टिकवण्यासाठी आणि भाजप (BJP) काँग्रेसकडून सत्ता हिसकावून राजस्थानमध्येही कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण राजकीय वर्तुळात सध्या वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. आता राजस्थानचं भवितव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हातात असल्याचं बोललं जात आहे. कारणंही तसंच आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी आणि राजस्थानमधील एक बडा चेहरा असलेले राजेंद्रसिंह गुढा (Rajendra Singh Gudha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

[ad_2]