Big Change In Asia Cup 2023 Rules For India vs Pakistan Super 4 Match ; भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आशिया कपचा नियम बदलला, नेमकं काय होणार जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो : भारत आणि पाकिस्तानचा सामना आता सुपर ४ मध्ये १० सप्टेंबरला होणार आहे. पण या सामन्यासाठी आता आशिया कपचा नियम बदलला आहे. त्यामुळे आता या सामन्यात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील पहिला सामना २ सप्टेंबरला झाला होता. या सामन्यात भारताची फलंदाजी झाली आणि त्यानंतर जोरदार पाऊस पडला. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधला दुसरा सामना हा १० सप्टेंबरला होणार आहे. पण या सामन्यासाठी आता आशिया कपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात पावसामुळे हिरमोड झाला होता. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पुन्हा पाऊस पडला तर काय करायचं, हा प्रश्न सर्वांपुढे होता. पण हा प्रश्न आता आशिया क्रिकेट कौन्सिलने सोडवला आहे. त्यासाठी आता आशिया कपचा नियमांत मोठा बदल करण्यता आला आहे. त्यानुसार आता या सामन्यात पाऊस पडला तरी त्याचा जास्त फरक पडणार नाही आणि हा सामान पूर्ण होऊ शकतो. कारण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जरी १० सप्टेंबरला पाऊस पडला तरी हा सामना राखीव दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबरला खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात कोणता संघ विजयी ठरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात निकाल लाकला नव्हता. पण आता दुसऱ्या सामन्यात राखीव दिवस असल्यामुळे निकाल लागणार आहे.

आय एम सॉरी विराट सर.. नवीन उल हकनं मागितली कोहलीची माफी? ट्वीट चर्चेत

भारत आणि पाकिस्तान हा सामना सर्वात जास्त पाहिला जातो. पण गेल्या सामन्यात मात्र चाहत्यांच्या पदरी निराशा पडली होती. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यात मात्र तसे होणार नाही.

[ad_2]

Related posts