Rohini Report on OBC Reservation : रोहिणी आगोयाच्या अहवालाचा फायदा नक्की कुणाला?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाला १८ सप्टेंबरला सुरुवात होतेय. आणि या अधिवेशनाचा अजेंडा काय यावर अनेक चर्चा घडतायंत. एक देश, एक निवडणूक, तसेच भारत विरुद्ध इंडिया या विषयांची चर्चा होत असतानाच आता ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील रोहिणी आगोयाचा अहवाल पटलावर मांडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अनेक वेळा मुदतवाढ मिळालेल्या रोहिणी आयोगाचा अहवाल काही दिवसांपूर्वी सरकारला सादर करण्यात आलाय. आणि तो अहवाल या विशेष अधिवेशनात मांडणार असल्याची चर्चा आहे. रोहिणी अहवालात काय आहे, या अहवालाचा ओबीसींना किती फायदा होईल?, काही जाती दुखावल्या जातील का?, या अहवालामुळे २०२४ च्या निवडणुकीवर काही परिणाम होणार का?, अशा अनेक अंगांनी आता यावर चर्चा होतोेय.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts