Asia Cup 2023 India Vs Pakistan Jasprit Bumrah Kl Rahul Axar Patel Mohahmamd Shami Rohit Sharama

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023 India vs Pakistan : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला रंगणार आहे. आशिया चषकातील भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण आता पुन्हा एकद हे दोन्ही संघ सुपर 4 मध्ये आमने सामने असतील. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत जोडले आहेत. पण रोहित शर्मापुढे आता प्लेईंग 11 चा पेच निर्माण झाला आहे. या दोन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिल्यास कुणाचा पत्ता कट होणार.. याकडे लक्ष लागलेय. त्याशिवाय शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेल यालाही प्लेईग 11 मध्ये स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. पाकिस्तानविरोधात प्लेईंग 11 मध्ये बदल होणार, हे निश्चित आहे.

इशान की राहुल ?

केएल राहुलच्या कमबॅकमुळे विकेटकिपर म्हणून कुणाला संधी मिळणार.. हा चर्चेचा विषय ठरला आहे. इशान किशन याने पाकिस्तानविरोधात वादळी खेळी केली होती. राहुलच्या अनुपस्थितीत इशान याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता राहुलचं कमबॅक झाल्यामुळे कुणाला संधी मिळणार… हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, इशान किशन याचा पत्ता कट होऊ शकतो.. कारण, राहुल भारताचा फर्स्ट चॉइस विकेटकीपर आहे. 

बुमराह की शमी – 

नेपाळविरोधातील सामन्याआधी जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणासाठी मायदेशात परतला होता. त्यामुळे मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले होते. पण जसप्रीत बुमराह परतल्यानंतर गोलंदाजीत पुन्हा बदल होणार, हे निश्चित आहे. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी एका गोलंदाजाला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. सिराज याचे स्थान निश्चित मानले जातेय, त्याने नेपाळविरोधात तीन विकेट घेतल्या होत्या.

अक्षर की शार्दूल ?

पाकिस्तानविरोधात भारतीय संघ कोलंबोच्या मैदानात उतरणार आहे. येथे फिरकीला मदत मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे टीम इंडिया अक्षर पटेल याच्यासोबत मैदानात उतरणार का? असा सवाल उपस्थित होतोय. 

पाऊस पुन्हा ठरणार महत्वाचा ?

Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल… तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.  

भारताची संभाव्य प्लेईंग 11 – 

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

[ad_2]

Related posts