Manoj Jarange Patil Hunger Strike Updates Maratha Reservation Arjun Khotkar Met Manoj Jarang And Gave CM Eknath Shinde Letter Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Patil News: अंतरवाली सराटी (जालना) : मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पाठवले पत्र… 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची देखील माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना एक बंद पाकिटात पत्र देखील पाठवले आहे. हेच बंद पाकीट घेऊन शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी हे पत्र मनोज जरांगे यांना दिले असून त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी बाहेर फिरतायत, जरांगेंनी आपली भूमिका स्पष्टचं मांडली 

लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

[ad_2]

Related posts