MI vs GT Qualifier 2 Of IPL 2023 In Ahmedabad And Mumbai Indians Upper Hand ; प्ले ऑफमध्ये कसं खेळायचं ते मुंबईकडून शिकावं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : अडखळती सुरुवात, फलंदाजांना हळूहळू गवसलेली लय आणि या सगळ्याचा ऐन सामन्यात मिळत गेलेला सकारात्मक निकाल अशा प्रक्रियेतून मुंबई इंडियन्स पुढे आला आहे. गेल्यावर्षी गुणतक्त्यात तळ गाठणाऱ्या मुंबईने यंदा ‘एलिमिनेट’चा अडथळा पार करून दुसऱ्या ‘क्वालिफायर’पर्यंत मजल मारली अन् आता त्यांना सहाव्या जेतेपदाचे स्वप्न पडू लागले आहे.आकाश मढवालने अवघ्या पाच धावा देत पाच विकेट टिपत लखनऊ सुपर जायन्ट्सची भंबेरी उडवली. ज्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल ‘एलिमिनेटर’ची लढत जिंकली. आज, शुक्रवारी आयपीएल टी-२० स्पर्धेच्या दुसऱ्या ‘क्वालिफायर’मध्ये मुंबईपुढे तगड्या गुजरात टायटन्सचे आव्हान असेल. जगातिक सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होईल.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत बुधवारी आकाश मढवाल मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या एका कामगिरीच्या जोरावर तो जसप्रीत बुमराह किंवा जोफ्रा आर्चर यांची पोकळी भरून काढू शकेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण आकाशने कामगिरीत सातत्य दाखवून मुंबईच्या विजयात हातभार लावणे महत्त्वाचे आहे.

जेतेपद राखण्यासाठी गुजरातला आज विजय आवश्यक आहे, तरच हार्दिक आणि कंपनीला रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत चेन्नईशी दोन हात करावे लागतील. शुभमन गिल, विजय शंकर यांच्यासह कर्णधार हार्दिक पंड्याकडून फलंदाजीतील योगदानही अपेक्षित आहे. गेल्या पाच आयपीएल लढतींत त्याने अनुक्रमे ८, फलंदाजी नाही, ८, ४ आणि २५ अशा धावा केल्या आहेत. मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करू शकेल, या दृष्टीकोनातून संघात स्थान देण्यात आलेल्या डेव्हिड मिलरला यावर्षीच्या आयपीएलमध्ये साधे अर्धशतकही करता आले नाही. शिवाय गेल्या तीन सामन्यांत त्याला दोन आकडी धावसंख्याही करणेही जमलेले नाही.

मुंबईची बाजू
-कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टिम डेव्हिड यांनी आव्हानांचा यशस्वी सामना केला. या फळीत पुढे नेहल वढेराही आला. त्यानेही प्रभावी कामगिरी केली…
-रोहित शर्मा, ईशान किशन ही सलामीची जोडी छाप पाडत आहे, मात्र हे सगळे फलंदाज गुजरातचा गोलंदाजीतील आधारस्तंभ मोहम्मद शमीला कसे ‘तोंड’ देतात ते सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकते
-याआधीच्या आयपीएल मोसमांमध्येही स्पर्धेच्या उत्तरार्धात मुंबईची कामगिरी उंचावल्याचे दिसले आहे.
-आकाश मढवालचे कोडकौतुक करताना बुजूर्ग स्पिनर पियुष चावलाचे १५ सामन्यांतील २१ विकेटच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईचा पाय खोलात होता तेव्हापासून चावला योगदान देतो आहे

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

-जेसन बेहरेनडॉर्फने ११ लढतींत १४ विकेट टिपल्या असून एरव्ही महागडा ठरणारा ख्रिस जॉर्डन ‘एलिमिनेटर’च्या झुंजीत (२-१-७-१) किफायतशीर ठरला.

[ad_2]

Related posts