Rahu Transit 2023 Rahu will enter Jupiters sign Difficult times will begin for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahu Transit in Pisces: राहूला ज्योतिषशास्त्रामध्ये मायावी ग्रह मानलं जातं. प्रत्येक ग्रहाप्रमाणे राहू ग्रह देखील त्याच्या राशीमध्ये बदल करतो. कुंडलीत राहूच्या दशा आणि महादशामुळे व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होतं, असं मानलं जातं. आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास ही राहू ग्रहाची लक्षणं मानली जातं. 

राहुचा प्रत्येक स्थितीत प्रतिकूल परिणाम होतो. जर कुंडलीत राहूची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला चांगले परिणाम देखील मिळतात. बहुतेक परिस्थितींमध्ये राहू लोकांना अशुभ प्रभाव देतो. ज्योतिष शास्त्रानुसार राहू 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहुच्या परिवर्तनाचा काळा काही राशींसाठी अशुभ मानला जातोय. जाणून घेऊया राहूच्या गोचरमुळे कोणत्या व्यक्तींना त्रास होणार आहे. 

कर्क रास

ज्योतिषशास्त्रानुसार राहूचे गोचर कर्क राशीसाठी शुभ मानलं जात नाही. या राशीच्या लोकांसाठी राहू गोचरानंतरचा काळ कठीण जाईल. या काळात तुम्हाला व्यवसायात नुकसानही होणार आहे. नोकरीत काही मोठे बदल होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

सिंह रास

ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीसाठी राहूचं गोचर त्रासदायक मानलं जातंय. राहूच्या या गोचरचा आर्थिक जीवनावर विपरीत परिणाम होणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. या काळात वैवाहिक जीवनात संकटाची परिस्थिती निर्माण होईल. पती-पत्नीमधील वाद वाढू शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा.

कन्या रास 

राहूच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा प्रवास चांगला मानला जात नाही. राहूच्या गोचरचा तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काम करायला आवडणार नाही. या काळात आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात आणि जोडीदारासोबत कलहामुळे मन अस्वस्थ राहील. 

मीन रास 

ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीत राहूचं गोचर होणार आहे. या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. अशा परिस्थितीत राहू संक्रमणादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक परिस्थिती बिघडू शकणार आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts